Saif Ali Khan : त्याच्याकडे चाकू होता याची कल्पनाच नव्हती! सैफ अली खानने पहिल्यांदाच सांगितली त्या रात्रीची कहाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Saif Ali Khan : त्याच्याकडे चाकू होता याची कल्पनाच नव्हती! सैफ अली खानने पहिल्यांदाच सांगितली त्या रात्रीची कहाणी

Saif Ali Khan : त्याच्याकडे चाकू होता याची कल्पनाच नव्हती! सैफ अली खानने पहिल्यांदाच सांगितली त्या रात्रीची कहाणी

Published Feb 10, 2025 10:07 AM IST

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानने त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच त्या रात्री नेमकं काय काय घडलं हे सांगितलं आहे. हल्लेखोराकडे चाकू असेल याची आपल्याला कल्पना नव्हती असं सैफ म्हणाला.

सैफ अली खान
सैफ अली खान

Saif Ali Khan Attack Story : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या ड्रायव्हरपासून ते त्याच्या कुटुंबियांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता पहिल्यांदाच सैफ अली खानने स्वत: त्या दिवशी घडलेल्या घटनेची कहाणी सांगितली आहे. सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याने पहिल्यांदा शरीफुल इस्लाम पाहिला तेव्हा काय वाटले होते. दोघांमध्ये वादावादी नेमकी कशी सुरू झाली, हे देखील त्याने सांगितले. त्याच्या हातात चाकू आहे, याचा सैफला अंदाज आला नव्हता. हल्लेखोराला पहिल्यांदा पाहिले तेव्हा सैफला वाटले की, त्याच्या हातात काठी आहे.

सैफ अली खानने टीओआयशी बोलताना सांगितले की, करीना डिनरसाठी बाहेर गेली होती आणि तो घरीच थांबला होता. कररीना परत आल्यावर काही वेळ गप्पा मारून दोघे झोपी गेले. थोड्या वेळाने घरातील मदतनीस घाईघाईत आली आणि म्हणाली की, ‘कोणीतरी घरात शिरले आहे.’ जेहच्या खोलीत एक माणूस आहे, ज्याच्याकडे चाकू आहे आणि तो पैशांची मागणी करत आहे. सैफ म्हणाला की, त्याला वेळ नक्की आठवत नसेल, पण तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. सैफ अली खानने सांगितले की, जेव्हा तो जेहच्या रूममध्ये गेला तेव्हा त्याच्या समोरचं दृश्य थक्क करणारं होतं.

सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर ! डॉक्टर म्हणाले...

नेमकं काय घडलं?

सैफ म्हणाला, ‘मी घाबरून आत बघायला गेलो आणि मला जेहच्या पलंगावर एक माणूस दिसला, ज्याच्या हातात दोन काठ्या होत्या (ज्या मला काठ्या वाटत होत्या). त्या काठ्या खरंतर एक्साॅ ब्लेड होत्या. त्याच्या दोन्ही हातात चाकू आणि चेहऱ्यावर मास्क होता. हे दृश्य भयानक होते. मग मला काहीतरी झालं आणि मी जाऊन त्याला सरळ पकडलं. मी धावत जाऊन त्याला खाली पाडले, मग आमच्यात हाणामारी झाली. तो माझ्यावर शक्य तितक्या जोरात वार करत होता, मग जोराचा आवाज आला आणि...’

मी प्रार्थना करत होतो की…

जेव्हा सैफ अली खानला विचारण्यात आले की, त्या हल्लेखोराकडे चाकू आहे, हे त्याच्या लक्षात आले नाही का? त्यावर अभिनेत्याने 'नाही' असे उत्तर दिले. ‘शॉक आणि अॅड्रेनालाईनमुळे मला जास्त वेदना जाणवल्या नाहीत. मग तो माझ्या मानेवर मारत राहिला आणि मी माझ्या हाताने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या तळहातावर, मनगटावर आणि हातावर चाकूच्या जखमा झाल्या आहेत. जोरदार हाणामारी झाली. तो दोन्ही हातांनी वार करत होता’, असे सैफ म्हणाला. सैफ अली खानने सांगितले की, काही वेळानंतर तो शरीफुलला रोखू शकला नाही. कारण एकाच वेळी त्याच्या हातात दोन चाकू होते आणि तो कुर्ता-पायजमा घालून अनवाणी पायाने होता. या माणसाला कोणीतरी माझ्यापासून दूर करेल, एवढीच प्रार्थना मी त्यावेळी करत होतो.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner