Saif Ali Khan : जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Saif Ali Khan : जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला!

Saif Ali Khan : जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला!

Jan 22, 2025 02:43 PM IST

Saif Ali Khan Attack : रिक्षा चालक भजन सिंह राणासोबत सैफ अली खानच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला!
जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला!

Saif Ali Khan Met Auto Driver : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची प्रकृती आता ठीक आहे. मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी येताना सैफ अली खानने पापाराझींना खास फोटो पोज दिली आणि हॅलो देखील म्हटलं. आता सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोचालकासोबतचे त्याचे फोटो समोर आले आहेत. सैफने स्वतः त्याची भेट घेतली आहे.

रिक्षा चालक भजन सिंह राणासोबत सैफ अली खानच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सैफ अली खान मंगळवारी हॉस्पिटलमध्येच ऑटोचालकाला भेटला होता. या फोटोमध्ये सैफ पांढरा शर्ट आणि डेनिम जीन्स घातलेला दिसत आहे. तर, त्याने डोळ्यांवर गॉगलही घातला आहे. सैफने ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवला आणि एकत्र बसून त्याचा फोटोही क्लिक केला. सैफने ऑटो चालकाची भेट घेऊन आभार मानले. यावेळी सैफ अली खानची आई शर्मिला टागोरही त्याच्यासोबत होती. त्यांनी ऑटो चालकाचे कृतज्ञता व्यक्त करून नेहमी इतरांना मदत करण्याचे प्रोत्साहन दिले. शिवाय त्याचे थकीत रिक्षा भाडे त्याला दिले जाईल, असे आश्वासनही सैफने दिले. याशिवाय गरज पडल्यास त्याला कधीही मदत करण्याचे आश्वासन सैफने दिले.

हल्ल्याच्या आधी कुणाला भेटला होता सैफ अली खान? हल्ला झाल्यानंतर करीना झाली कावरीबावरी! Video Viral

रिक्षा चालक मदतीला धावून आला!

अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री एका चोराने हल्ला केला होता. त्याच्या घरात चोर घुसले होते. या हल्ल्यात सैफवर ६ वेळा वार करण्यात आला होता. सैफ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ऑटोने त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. खरंतर त्यावेळी सैफच्या घरी एकही ड्रायव्हर नव्हता. त्यामुळे त्याने ऑटोची मदत घेतली. भजन सिंह राणा यांनीच सैफ आणि त्याचा मुलगा तैमूरला त्यांच्या ऑटोतून हॉस्पिटलमध्ये नेले.

सैफकडून पैसेही घेतले नाहीत!

ऑटो चालकाने मीडियाशी बोलताना त्या रात्रीचा संपूर्ण प्रकार सांगितला. रिक्षा चालक म्हणाला की, 'सैफच्या मानेतून रक्त येत होते. त्याचे सर्व कपडे रक्ताने माखले होते. खूप रक्त येत होते. तो स्वतः माझ्याकडे चालत आला, त्याच्यासोबत एक लहान मुलगाही होते. मला त्याला पटकन दवाखान्यात न्यावे लागले. आम्ही आठ-दहा मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मी तिथे गेलो आणि मला कळले की, तो अभिनेता सैफ अली खान आहे. या धाडसासाठी एका संस्थेने ड्रायव्हर भजन सिंह राणा यांच्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना ११,००० रुपयांचे बक्षीस दिले आहे.

Whats_app_banner