ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या 'देवरा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी-saif ali khan jahnvi kapoor and ntr devara box office collection day 1 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या 'देवरा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या 'देवरा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 28, 2024 11:04 AM IST

Devara Box office Collection: देवरा शुक्रवारी, २७ सप्टेंबररोजी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटात एनटीआरसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊन...

देवरा बॉक्स ऑफिस डे 1
देवरा बॉक्स ऑफिस डे 1

Devara Part 1 Box Office Collection Day 1: दिग्दर्शक कोरतला शिवाचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'देवरा-पार्ट १' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली होती. अखेर शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. ज्युनिअर एनटीआरने ६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या सोलो चित्रपटाच्या माध्यमातून वर्चस्व गाजवले आहे. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा धुमाकूळ

देवरा या चित्रपटात एनटीआरसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहे. जान्हवी कपूरचा हा पहिलाच तेलगू चित्रपट आहे. सैफ अली खान देवरा मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. देवरा चित्रपटाला ओपनिंग डेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. दरम्यान, देवराच्या ओपनिंग डेच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कमावले?

ज्युनिअर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांचा 'देवरा-पार्ट 1' हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले होते. या चित्रपटात तुम्हाला भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे, तसेच सस्पेन्सचा आनंदही घेता येणार आहे. आता देवरा चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे. आता देवरा चित्रपटाच्या ओपनिंग डेची आकडेवारी समोर आली आहे. सॅनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार देवराने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 77 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कलेक्शनचा हा आकडा सर्व भाषांमध्ये एकत्रित आहे. ही चांगली सुरुवात मानली जाते. मात्र, या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा

काय आहे देवरा ची कहाणी?

देवरा चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर हा पूर्णपणे ज्युनियर एनटीआरवर आधारित आहे. यात एनटीआर चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खानसोबत समुद्रमार्गे बेकायदेशीर कृत्ये करतो. एक दिवश अचानक एनटीआरला आपण जे काही करत आहोत ते चुकीचे आहे याची जाणीव होते. यानंतर त्याला या गुन्हेगारीच्या दुनियेतून बाहेर पडायचे आहे, पण सैफला हे आवडत नाही. मग इथूनच त्यांच्यातील लढाई सुरू होते. देवरा (एनटीआर) गायब होतो, पण अन्याय करणाऱ्यांना सोडत नाही.

Whats_app_banner