बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच सैफने त्याचा ५४वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता सैफ अली खान 'रेस ४' या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सैफचा एक जुना किस्सा पुन्हा चर्चेत आहे. सैफला एका नाइट क्लबमध्ये मारहाण करण्यात आला होता.
नेहा धुपियाचा पॉडकास्ट शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये सैफने स्वत: हा किस्सा शेअर केला होता. सैफने सांगितले होते की, "मी दिल्लीतील एका नाईट क्लबमध्ये बसलो होतो आणि तेवढ्यात एक मुलगा माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, 'प्लीज माझ्या गर्लफ्रेंडसोबत डान्स कर. मी नकार दिला. मी म्हणालो, मी हे सगळं करत नाही. तर तो म्हणाला, तुझा चेहरा खूप सुंदर आहे. हे ऐकून मला आनंद झाला. मला वाटलं की तो खरंच माझं कौतुक करतोय आणि मी हसलो."
पुढे सैफ म्हणाला, "त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्याने व्हिस्कीच्या बाटलीने माझ्या डोक्यावर ही वार केले. माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं म्हणून मी वॉशरूममध्ये गेलो. तो माझ्या पाठोपाठ वॉशरूममध्ये गेला. माझ्या डोक्यातून खूप रक्त निघत होतं म्हणून मी माझ्या डोक्यावर पाणी ओतायला लागलो आणि पाणी ओतताना मी त्या व्यक्तीला म्हणू लागलो, बघा तू काय केले आहेस. तो संतापला होता. त्याने पुन्हा माझ्यावर हल्ला केला. तो वेडा होता. त्याने मला मारून टाकले असते."
वाचा: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा
सैफ लवकरच ‘रेस ४’ या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच यापूर्वी त्याचे 'आदिपुरुष', 'विक्रम वेदा', 'बंटी और बबली', 'भूत पोलीस', 'जवानी जानेमन', 'तान्हाजी' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. 'आदिपुरुष' या चित्रपटासाठी तर सैफला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता सैफच्या आगामी चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.