Saif Ali khan Discharged : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला उपचारानंतर लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. तब्बल ५ दिवसांनंतर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या बंगल्यात घुसलेल्या आरोपी शहजादला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने सैफवर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं होतं. त्याच्यावर पाच ते सहा वार करण्यात आले होते. यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सैफ अली खानला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्याला घरी नेण्यासाठी करीना कपूर खान रुग्णालयात पोहोचली होती. मात्र दोघे सोबत घरी गेले की नाही या बाबत माहिती मिळू शकली नाही. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता. यावेळी घरातील महिला कर्मचारी हिने आरडा ओरडा केला होता. यामुळे सैफ त्याच्या रूममधून बाहेर आला यावेळी लपून बसलेल्या आरोपीने सैफवर पाठीमागून चाकूने हल्ला केला होता. सैफच्या मानेजवळ गंभीर जखम झाली होती. आरोपीने त्याच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागावर देखील चाकूने हल्ला केला होता. दोघांच्या झटापटीत सैफवर चाकूने ६ वार करण्यात आले होते. यामुळे सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया केल्या असून यातील एका शस्त्रक्रिये दरम्यान, त्याच्या जखमेतून चाकूचा तुकडा देखील बाहेर काढण्यात आला.
सैफवर झालेल्या चाकू हल्ल्यात त्याच्या मनक्याला जबर मार लागला. चाकू थोडा जारी अंत गेला असता, तर सैफचा जीव संकटात सापडला असता, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या सैफ ठीक आहे. त्याला काही दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.
सैफच्या हल्ले खोराला पोलिसांनी ठण्यातून अटक केली आहे. आरोपी हा बांगलादेशचा नागरिक असून काही महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची खरी ओळख कुणालाही कळू नये म्हणून तो विजय दास या नावाने ठाण्यातील एका बारमध्ये काम करत होता.
संबंधित बातम्या