सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले...

सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले...

Jan 18, 2025 10:51 AM IST

Saif Ali Khan Attack : सैफवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला त्याचा फोटो समोर आला आहे. चाकूचा एक भाग सैफच्या शरीरात अडकून राहिला होता.

सैफ अली खान
सैफ अली खान

Saif Ali Khan Injurey  : गुरुवारी रात्री उशिरा चोरट्याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला आणि अभिनेत्यावर हल्ला केला. त्याने अभिनेत्यावर चाकूने ६ वार केले होते, त्यापैकी २ जखमा अत्यंत गंभीर होत्या. सैफवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तो सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हॉस्पिटलच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरने सांगितले की, जखम थोडी खोल असती तर सैफचा मृत्यू झाला असता. अभिनेता खरा ‘हिरो’ होता आणि प्रचंड रक्तस्त्राव होत असताना तो सिंहासारखा रुग्णालयात आला होता, असेही डॉक्टरांनी म्हटले.

दरम्यान, सैफवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला त्याचा फोटो समोर आला आहे. खरं तर चाकूचा एक भाग सैफच्या शरीरात अडकून राहिला होता. हा तुकडा शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आला आणि नंतर पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाठीच्या कण्याला झालेल्या जखमांव्यतिरिक्त त्याच्या डाव्या हाताला एक आणि मानेच्या उजव्या बाजूला एक अशा दोन खोल जखमा झाल्या आहेत. प्लास्टिक सर्जरी टीमने या जखमांवर शस्त्रक्रिया केली आहे. शुक्रवारी सैफला आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये हलवण्यात आलं. आदल्या दिवशी अनेक सेलेब्स आणि कुटुंबातील सदस्य सैफला भेटायला गेले होते, पण आता कमी लोकांना येण्यास सांगण्यात आले आहे.

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान अजूनही बेशुद्ध? जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती

भेटायला येणाऱ्या लोकांवर निर्बंध!

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 'सैफला विश्रांती घेता यावी म्हणून आता आम्ही त्याला भेटायला येणाऱ्या पाहुण्यांच्या प्रवेशावर निर्बंध लावला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी विश्रांती घेणे गरजेचे आहे.' सैफच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून, त्याला २-३ दिवसांमध्ये घरी सोडण्यात येईल, असे देखील डॉक्टर म्हणत आहेत. 
 

चाकूचा फोटो (इंडिया टीवी)
चाकूचा फोटो (इंडिया टीवी)

काय म्हणाली करीना कपूर?

करीनाने गुरुवारी सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी केले. यात तिने म्हटले की, ‘आजचा दिवस आमच्यासाठी खूप कठीण होता. या दुर्घटनेतून आम्ही अजूनही सावरत आहोत. अशा कठीण काळात आम्ही प्रसारमाध्यमांना आणि पॅपराझींना विनंती करतो की, त्यांनी आमच्या प्रायव्हसीची काळजी घ्यावी आणि अनावश्यक कव्हरेज करू नये.’

सैफवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. गुरुवारी करीना मुलांसोबत करिश्माच्या घरी होती. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. आदल्या दिवशी पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. हा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. 

Whats_app_banner