बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्यामुळा चाहत्यांमध्ये चिंत्तेचे वातावरण पाहायला मिळत आहे. असे नेमके काय झाले की सैफला दावाखान्यात दाखल व्हावे लागले आहे.
सैफ अली खानच्या गुडघे आणि खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला तातडीन कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. समोर आलेल्या माहितीनु, सैफच्या खांद्याला फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्जरी होणार आहे. रुग्णालयात सैफसोबत त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान देखील हजर होती.
वाचा: कसा आहे पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूं' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
'दैनिक भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खानच्या गुडधा आणि खांद्यामध्ये फ्रॅक्चर आहे. खान कुटुंबीयांना सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी माहिती दिलेली नाही. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'देवारा'चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो 'भहिरा' ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर काही झाले की काय? असा अंदाज वर्तवला जात आहे.