मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sridevi Prasanna Teaser: सई-सिद्धार्थची आगळी-वेगळी लव्हस्टोरी, “श्रीदेवी प्रसन्न"चा टीझर प्रदर्शित

Sridevi Prasanna Teaser: सई-सिद्धार्थची आगळी-वेगळी लव्हस्टोरी, “श्रीदेवी प्रसन्न"चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 03, 2024 12:47 PM IST

Saie Tamhankar Upcoming movie: विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sridevi Prasanna Teaser
Sridevi Prasanna Teaser

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी संधी मात्र प्रेक्षकांना फार मिळाली नाही. 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या माध्यमातून ही भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात हीच कथा 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून गेली.
वाचा: नवाजुद्दीनसोबतच्या सीनमुळे पॉर्न अभिनेत्रीचा टॅग मिळाला; मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाचे नाव नुसते फिल्मी नाही तर याचे कथानकच टोटल फिल्मी म्हणावे लागेल. 'लव एट फर्स्ट साईट'चे स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न, मॅट्रिमोनी साइटवर 'श्रीदेवी' या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मने जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमके काय काय घडते या कथानकाला 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे. या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे.

WhatsApp channel