मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 05, 2024 11:03 AM IST

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे. यावेळी तिने राजकारणाविषयी देखील भाष्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. तिने अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली जात आहे. सई सतत तिच्या लूक्समुळे तसेच वक्तव्यामुळे चर्चेत असते. सध्या देशभरात निवडणुकींचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यावर सईने प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सई ताम्हणकर नुकतीच शिर्डीला साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. तिने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राजकारणावर भाष्य केले. त्यावेळी ती राजकारण हा वेट आणि वॉचचा गेम असतो असे म्हटले आहे. तसेच पाडव्याला नव्या प्रोजेक्टविषयी घोषणा करणार असल्याची माहिती देखील सईने दिली आहे.
वाचा: २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

राजकारणावर सईची प्रतिक्रिया

सईने राजकारणाविषयी मत मांडताना म्हटले की, "जसा एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो किती कमाई करेल हे सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. राजकारण हा खरं तर वेट अँड वॉचचा गेम आहे. त्यामुळे आपण ते पाहायचा आणि एन्जॉय करायचा असतो. राजकारणात सध्या नव्या विचारसरणीची गरज आहे आणि ती राजकारणात येतही आहे." आता सई ताम्हणकर नेमकं असे का म्हणाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

सईने दिली आगामी प्रोजेक्टविषयी माहिती

पुढे सईला तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी विचारण्यात आले. "हो माझे काही नवीन प्रोजेक्ट येत आहेत. पण असे म्हणतात की आपण जी देवाकडे प्रार्थना करतो ती सांगायची नसते. त्यामुळे मी आता ते सांगणार नाही. बाकी गोष्टी तुम्हाला पाडव्याला कळतीलच" असे ती म्हणाली. त्यामुळे येत्या पाडव्याला सई तिच्या चाहत्यांना कोणती गुडन्यूज देणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
वाचा: चला हवा येऊ द्या आमच्यासाठी भावनिक शो; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

सईच्या कामाविषयी

सई ताम्हणकरचा काही दिवसांपूर्वी 'भक्षक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तिच्यासोबत भूमि पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यापाठोपाठ आता सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. तसेच प्रतीक गांधी आणि इमरान हाश्मीसोबत ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या नावाच्या दोन बड्या प्रोजेक्टमध्ये सई ताम्हणकर भूमिका वठवताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point