Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

Feb 29, 2024 12:02 PM IST

Maharashtrachi Hasyajatra Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कार्यक्रमात सई ताम्हणकर परिक्षकाच्या खुर्चीत विराजमान झालेली पाहायला मिळाली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून सई या कार्यक्रमात दिसत नाहीये.

Maharashtrachi Hasyajatra Sai Tamhankar
Maharashtrachi Hasyajatra Sai Tamhankar

Maharashtrachi Hasyajatra Sai Tamhankar:महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळवून हसवण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांना देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे दोघे या कार्यक्रमाच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकर परीक्षक पदाच्या खुर्चीवरून गायब झालेली दिसत आहे. आता सई ताम्हणकर नक्की कुठे गेली? तिने या कार्यक्रमाला रामराम केला का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर, नुकतीच सई ताम्हणकर हिने देखील एक पोस्ट केली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचे नाव घेतले जाते. मात्र, सध्या सई ताम्हणकर हिच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सईच्या नव्या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सई सध्या ‘श्रीदेवी प्रसन्न’मधून मराठी, तर ‘भक्षक’मधून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत आहे. याच दरम्यान तिने एक पोस्ट केली आहे. या पोस्टने आता सगळ्यांनाच वेगवेगळे प्रश्न पडले आहेत.

Deepika Padukone Pregnant : कुणी तरी येणार येणार गं... दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने शेअर केली गुडन्यूज!

काय म्हणाली सई ताम्हणकर?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कार्यक्रमात सई ताम्हणकर परिक्षकाच्या खुर्चीत विराजमान झालेली पाहायला मिळाली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून सई या कार्यक्रमात दिसत नाहीये. त्यामुळे सई नेमकी कुठे गेली आहे? याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडले होते. दरम्यान,सई ताम्हणकर हिने स्वतः सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे. सई ताम्हणकर हिने पोस्ट शेअर करत लिहिले की,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आवडती गोष्ट कोणती, तर त्या परिक्षकाच्या खुर्चीत बसण्याची मला मिळालेली संधी... मी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटला आणि शूटींगला खूपच मिस करत आहे. मी सध्या आगामी वेब सीरिजच्या चित्रीकणामुळे आहे.’ या पोस्टमधून सईने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये न दिसण्याचं कारण सांगितलं आहे.

आता सई ताम्हणकर आपलं वेब सीरिज आणि चित्रपटांचं शूटिंग संपवून या सेटवर, विशेष म्हणजे‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर परत कधी येणार, याची चाहत्यांना आतुरता आहे. सगळेच सई परतून येण्याची वाट बघत आहेत.

Whats_app_banner