Sai Tamhankar Relationship Status: मराठी मनोरंजन विश्वातील धडाकेबाज अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांचा हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत. नुकतीच तिने एका वाहिनीला मुलाखत दिली. यात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अनेकदा सई ताम्हणकरला तिच्या रिलेशनशिपवर प्रश्न विचारला जातो. या मुलाखतीत अखेर तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
मराठीच नव्हे तर, सई ताम्हणकर हिने हिंदी मनोरंजन विश्वात देखील आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. हिंदीतही सईने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. सोशल मीडियावर देखील सई ताम्हणकर हिचा मोठा चाहता वर्ग आहे. सई ताम्हणकर हिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. सईने नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एका छोट्याशा गावातून आलेली सई ताम्हणकर आजघडीला सगळ्यांच्या मनावर राज्य करतेय. तिचा हा प्रवास खरंच खूप संघर्षमय होता. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील तिची भूमिका तिच्या आयुष्याशी काहीशी मिळतीजुळती आहे.
सई ताम्हणकर विषयी हमखास विचारला जाणारा आणि सर्च केला जाणारा प्रश्न म्हणजे अभिनेत्री सध्या सिंगल आहे की, ती कुणाला डेट करत आहे? आता या मुलाखतीत देखील सई ताम्हणकर हिला असाच रिलेशनशिप संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. सई ताम्हणकरचं रिलेशनशिप स्टेटस काय? हे विचारल्यावर सईने लगेच उत्तर देत ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ असं म्हटलं. मात्र, सईच्या या उत्तरामुळे आता सगळे चाहते संभ्रमात पडले आहेत. सई ताम्हणकर नक्की सिंगल आहे की, मिंगल? असे सगळेच विचारत आहेत.
काहीच महिन्यांपूर्वी सई ताम्हणकर हिने आपल्या नात्याची कबुली दिली होती. चित्रपट निर्माता अनिश जोग याच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करून सईने प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेत करत आहेत. मात्र, आता सई ताम्हणकर हिने ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ म्हटल्याने सगळ्या चाहत्यांचा गोंधळ उडला आहे. मात्र, अभिनेत्रीने यावर सविस्तर बोलणं टाळलं आहे. सध्या तरी सई तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच ती भूमी पेडणेकरसोबत ‘भक्षक’ या चित्रपटात झळकणार आहे.