Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू

Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 09, 2024 05:39 PM IST

Manvat Murders Review: आशुतोष गोवारीकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारी सीरिज 'मानवत मर्डर' ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता ही सीरिज कशी आहे चला जाणून घेऊया...

Manvat Murders Review
Manvat Murders Review

Manvat Murders Web Series: गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मधील एक उदाहरण म्हणजे 'मानवत मर्डर' वेब सीरिज. ही सीरिज महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात असलेल्या मानवत या गावातील सत्य घटनेवर आधारीत आहे. १९७२ ते १९७३ साली मानवत या गावातून लहान मुले आणि काही महिलांचा खून झाला होता. रमाकांत कुलकर्णीं या पोलीस अधिकाऱ्याने या खुनांचा छडा घेतला होता. शोध सुरु असताना अनेक गोष्टी समोर येत होत्या. त्यावर आधारीत 'मानवत मर्डर' ही वेब सीरिज आहे. आता या सीरिजमध्ये नेमकं काय दाखवण्यात आले आहे चला जाणून घेऊया...

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४ ऑक्टोबर रोजी 'मानवत मर्डर' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. सीरिजमध्ये एका व्यक्तीने पुत्र प्राप्तीसाठी अंधश्रद्धेच्या आधारावर केलेले हत्याकांड दाखवण्यात आले आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, नरबळी, जाणत्या, पारधी समाज या सगळ्यावर भाष्य करणारी 'मानवत मर्डर' ही सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले आहे. तसेच सीरिजमध्ये मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, आशुतोष गोवारीकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

काय आहे सीरिजची कथा?

'मानवत मर्डर' या सीरिजमध्ये १९७२ ते १९७३ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. मानवत या गावात राहणारे उत्तमराव बारहाटे, रुक्मिणी बारहाटे, समिंद्री बारहाटे आणि रमाकांत कुलकर्णी या पात्रांभोवती कथा फिरताना दिसते. रुक्मिणी बारहाटेला निपुत्रिक म्हणून हिणवले जात असते. तर उत्तमराव हे वाड्यात असलेल्या खजिन्याचा शोध घेत असतात. या दोन अंधश्रद्धांमधून मानवत हत्याकांड घडले होते. या दोन्ही गोष्ट करत असताना कोवळ्या मुलींची हत्या करणे, त्यानंतर दोन महिलांचा बळी देणे आणि सगळ्यात शेवटी एका मुलाचा बळी देण्यात येतो. जेव्हा रमाकांत कुलकर्णी या हत्याकांडाचा शोध घेतात तेव्हा त्यांच्या समोर सत्य येते. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निष्पाप जिवांचा बळी जातो हे पाहून धक्का बसतो.
वाचा: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

कलाकार आणि त्यांचा अभिनय

आशुतोष गोवारीकरने रमाकांत कुलकर्णी जिवंत केले आहेत. त्याच प्रमाणे मकरंद अनासपुरेने उत्तमराव बारहाटे, सोनाली कुलकर्णीने रुक्मिणी बारहाटे आणि सई ताम्हणकरने समिंद्री उत्तम साकारली आहे. किशोर कदम शेवटच्या भागात येतो. भूमिका तर सगळ्याच कलाकारांनी उत्तम केल्या आहेत. आठव्या भागापर्यंत समिंद्रीही काय आहे? ते कळत जातं आणि अकरा, बकरा उकराचं कोडंही उलगडतं. सई प्रमाणेच आशुतोष गोवारीकरने साकारलेली रमाकांत कुलकर्णींची भूमिका लक्षात राहते.

Whats_app_banner