मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sai Tamhankar Birthday: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर

Sai Tamhankar Birthday: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 25, 2024 08:05 AM IST

Sai Tamhankar Birthday: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने एका मुलाखतीमध्ये आईसोबत वर्षातील सहा महिने एका घरात राहते असे सांगितले आहे. चला जाणून घेऊया सई नेमकं काय म्हणाली...

Sai Tamhankar: सई ताम्हणकर वाढदिवस
Sai Tamhankar: सई ताम्हणकर वाढदिवस

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ मराठीच नाही तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. आज २५ जून रोजी सई ताम्हणकरचा ३८वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सईच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

सईने हंटर, भक्षक या सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ती लवकरच 'मटका किंग' या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या सई तिच्या भूमिकांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. पण सई तिच्या आईसोबत राहत नाही. त्या दोघी वर्षातून केवळ सहा महिने एकत्र राहात असल्याचे स्वत: सईने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
वाचा: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

सईचा प्रवास

आज सई जरी प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास जराही सोपा नव्हता. तिच्या या प्रवासात तिची आई कायमच सोबत होती. सईने जेव्हा मुंबईत आलिशान घर घेतले तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर सर्वांना आनंदाची बातमी सांगितली होती. पण सईची आई तिच्यासोबत या घरात राहात नाही. सई ही मूळची सांगलीची आहे. तिने वयाच्या १९व्या वर्षी कामासाठी घर सोडले होते. जवळपास १० वर्षे ती मुंबईत एका ठिकाणी राहिली. त्यामुळे सईने मुंबईतील घराचे नाव द इलेव्हन्थ प्लेस असे नाव ठेवले आहे.
वाचा: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस

आईसोबत सहा महिने राहाते सई

सई वर्षातून केवळ सहा महिने आईसोबत असते किंवा कधीकधी त्यापेक्षाही कमी वेळ तिला आईसोबत घालवायला मिळतो. याविषयी बोलताना सई एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, 'आमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. पण आम्ही फार एकमेकींसोबत राहात नाही. मी आम्हा दोघींना तलवारीची उपमा देईन. जशा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसेच आम्ही दोघी एकाच घरात एकत्र राहू शकत नाही. आम्ही सहा महिने एकत्र राहातो आणि सहा महिने वेगळे राहातो. पण या तलवारींनी लढलेल्या लढाया आणि तो प्रवास आज ही माझ्या दृष्टीवे खूप मोठा आहे. मी अनेक लढाया जिंकून इथपर्यंत पोहोचली आहे.'
वाचा: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का

WhatsApp channel