Sai Tamhankar Lip lock scene : ओटीटी विश्वात सध्या अनेक नव्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. तर, या ओटीटी विश्वाला आता मराठी कलाकारांची भुरळ पडली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जवळपास सगळ्याच वेबसीरिजमध्ये मराठी कलाकार आपला जलवा दाखवताना दिसत आहेत. तर, मराठी कलाकारही कथेच्या गरजेनुसार अतिशय बोल्ड सीन्स देताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्रिया बापट हिचा लेस्बियन लीपलॉक सीन व्हायरल झाला होता. आता असाच एक करताना अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर हिची नवी वेब सीरिजच लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'क्राईम बीट' असे या नव्या वेब सीरिजचे नाव आहे. यात सईबरोबर अभिनेता साबीक सलीम, राहूल भट्ट, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, सबा आझाद हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, यात सईचा बोल्ड अंदाज पाहायला मिळला आहे.
'क्राईम बीट' या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार असून, या टीझरमध्ये त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय. वेब सीरिजच्या टीझरला काही तासाच चांगला प्रतिसाद मिळाला असून, चाहते देखील ही वेब सीरिज पाहण्यासाठी उत्सुकत झाले आहेत. वेब सीरिजच्या याच टीझरमध्ये सई ताम्हणकरचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला आहे. ‘क्राईम बीट’च्या या टीझरमध्ये सई ताम्हणकर स्विमिंग पूलमध्ये लेस्बियन लीपलॉक करताना दिसली आहे. या सीरिजच्या निमित्ताने पुन्हा एकदा सईचा बोल्ड अवतार पाहायला मिळणार आहे.
एक मिनिट २० सेकंदाच्या टीझरमध्ये, साकिब एका स्टोरीसाठी कोणाचा तरी पाठलाग करताना दिसत आहे. त्याने त्याच्या बॉसला सत्य समोर आणण्याचे आव्हान दिले आहे. त्यानंतर राहुल साकारत असलेला प्रभावशाली राजकारणी आणि दिल्ली सुरक्षित करण्याच्या मोहिमेवर असलेला कर्तव्यदक्ष पोलीस अर्थात आदिनाथ कोठारे आपल्याला पाहायला मिळतात. यात इतर अनेक महत्त्वाच्या पात्रांची झलक देखील पाहायला मिळाली आहे.
संबंधित बातम्या