मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: मी याचा फोन फोडू का?; सई ताम्हणकर का आणि कुणावर भडकली? व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: मी याचा फोन फोडू का?; सई ताम्हणकर का आणि कुणावर भडकली? व्हिडीओ होतोय व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 13, 2024 10:16 AM IST

Sai Tamhankar Viral Video: सई ताम्हणकर हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर एका फोटोग्राफरवर चिडताना दिसली आहे.

Sai Tamhankar Viral Video
Sai Tamhankar Viral Video

Sai Tamhankar Viral Video: आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे, तर बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर हिचे नाव देखील घेतले जाते. सई ताम्हणकर हिने मराठी मनोरंजन विश्वासोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचे हक्काचे स्थान मिळवले आहे. हिंदीतही सईचा प्रेक्षक वर्गात वाढताना दिसत आहे. आपल्या बोल्डनेस आणि बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई ताम्हणकर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, आता सई ताम्हणकर हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर एका फोटोग्राफरवर चिडताना दिसली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर चिडतानाचा हा व्हिडीओ हा स्वतः त्या फोटोग्राफरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी एक फोटोग्राफर सई ताम्हणकरच्या जवळ जाऊन तिला म्हणतो की, ‘मॅडम मी आजच तुमचा मितवा चित्रपट पाहिला’. फोटोग्राफरचे हे बोलणे ऐकून सईचे हावभावच बदलले. यावेळी वैतागलेली सई ताम्हणकर त्याला म्हणते की, ‘मी याचा फोन फोडू का रे? मी मितवा चित्रपटात नव्हते.’ मात्र, ‘मितवा’ चित्रपटात सई ताम्हणकर नव्हती, यावर त्या फोटोग्राफरचा विश्वासच बसत नव्हता. त्याचा विश्वासच नाही, हे बघून सही ताम्हणकरने स्वतःच्या हातून फोन घेतला आणि त्यालाच प्रश्न विचारून रेकॉर्डिंग करू लागली.

OTT Release: मर्डर, सस्पेन्स आणि कॉमेडी… ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची रोलरकोस्टर राईड! पाहा रिलीजची यादी

सईने घेतली फोटोग्राफरची शाळा

अर्थात सई ताम्हणकरचा हा राग नव्हता, तिने गंमतीत पापाराजींची शाळा घेतली होती. यावेळी सई ताम्हनकर हिने त्या फोटोग्राफरचा मोबाईल घेत त्याचाच व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. यावेळी सई ताम्हणकरने त्याला विचारले की, ‘सांग मी कोणत्या चित्रपटात होते?’. त्यावेळी फोटोग्राफरला नाव आठवले नाही. मात्र, त्याने चित्रपटाचे वर्णन करताना सांगितले की, ‘तुम्ही एका चित्रपटात स्वप्निल जोशीसोबत काम केले होते. त्या चित्रपटात तुम्ही स्वप्निलची पत्नी होतात.’ अर्थात तो फोटोग्राफर सई ताम्हणकरच्या ‘तु ही रे’ या चित्रपटाबद्दल बोलत होता. मात्र, आयत्यावेळी त्याला चित्रपटाचे नावच न आल्याने हा गोंधळ निर्माण झाला होता. सई ताम्हणकर हिने स्वतः सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

व्हिडीओ होतोय व्हायरल

सई ताम्हणकरची पापाराझींसोबतची ही धमाल आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सई ताम्हणकर ही नेहमीच सगळ्यांशी खूप प्रेमाने वागते. यामुळे ती चाहत्यांसोबतच पापाराझींची देखील लाडकी आहे. सईसोबतचा हा व्हिडीओ शेअर करताना फोटोग्राफरने कॅप्शनमध्ये अखेर या चित्रपटाचे नाव लिहिले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘मला त्यावेळी ‘तु ही रे’ चित्रपटाबद्दल बोलायचं होतं.’ त्याच्या या पोस्टवर आता साई ताम्हणकरने देखील कमेंट केली आहे. ‘तु ही रे’ अगदी बरोबर. आता कसं तुला चित्रपटाचं नाव आठवलं’. त्यावर उत्तर देताना फोटोग्राफर म्हणाला की, ‘नाव लक्षात होतं. पण सुंदर सईला बघून सगळं विसरायला होतं.’

IPL_Entry_Point