सई ताम्हणकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या ‘या’ दोन बिग बजेट चित्रपटात झळकणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सई ताम्हणकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या ‘या’ दोन बिग बजेट चित्रपटात झळकणार

सई ताम्हणकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या ‘या’ दोन बिग बजेट चित्रपटात झळकणार

Mar 28, 2024 08:28 AM IST

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ या चित्रपटात सई ताम्हणकरची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता पुन्हा एकदा सईच्या हाती बॉलिवूडचे दोन बिग बजेट प्रोजेक्ट्स लागले आहेत.

सई ताम्हणकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या ‘या’ दोन बिग बजेट चित्रपटात झळकणार
सई ताम्हणकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या ‘या’ दोन बिग बजेट चित्रपटात झळकणार

आपल्या दमदार अभिनयाने सई ताम्हणकर नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते. मराठीच नव्हे, तर सई ताम्हणकर हिने हिंदी मनोरंजन विश्वात देखील धुमाकूळ घातला आहे. सई ताम्हणकर नुकतीच ‘भक्षक’ या चित्रपटात झळकली होती. अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात सई ताम्हणकरची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता पुन्हा एकदा सईच्या हाती बॉलिवूडचे दोन बिग बजेट प्रोजेक्ट्स लागले आहेत. लवकरच सई ताम्हणकर बॉलिवूडवर अधिराज्य गाजवताना दिसणार आहे.

सई ताम्हणकर आता ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. यासोबतच इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आणखी एका नव्या चित्रपटात देखील सई ताम्हणकरची वर्णी लागली आहे. २०२४मध्ये सई ताम्हणकर बॉलिवूड गाजवताना दिसणार आहे. प्रतीक गांधी आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या नावाच्या दोन बड्या प्रोजेक्टमध्ये सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, सई इमरान आणि प्रतीक यांच्या बरोबरीने कोणती भूमिका साकारणार, हे अद्याप समोर आलेले नाही. सई ताम्हणकरच्या ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या दोन्ही आगामी प्रोजेक्टची घोषणा ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आली असून, आता लवकरच त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

कमी वयातच टक्कल पडल्यामुळे ‘हिमालयपुत्र’ अक्षय खन्नाची कारकीर्द आली होती संपुष्टात! वाचा...

एक-दोन नव्हे तीन प्रोजेक्ट्स येणार!

सई ताम्हणकरच्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची आतुरता आहे. बॉलिवूड गाजवणारा इमरान हाश्मी आणि ओटीटी मनोरंजन विश्व गाजवणारा प्रतीक गांधी यासारख्या दोन दमदार कलाकारांच्या सोबतीने सई काम करणार असून, तिच्या इतकेच तिचे चाहते देखील खूप उत्सुक आहेत. याबद्दल बोलताना सई ताम्हणकर म्हणाली की, ‘एखाद्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करण्याची संधी मिळते, हेच खूप मोठं आहे. मला ही संधी एक दोनदा नव्हे, तर तीनदा मिळाली आहे. ‘डबा कार्टेल’च्यासोबतीला ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ हे सगळेच प्रोजेक्ट अतिशय वेगवेगळे असून, माझ्या करिअरचा एक अविभाज्य भाग बनले आहेत.’

सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा...

स्वप्नपूर्ती झाली!

इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना सई ताम्हणकर म्हणाली की, ‘या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या दोघांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवणार आहे. दोघेही उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमधल्या अशा दोन मोठ्या कलाकारांसोबत काम करणं, याहून मोठं काय असणार आहे...’

Whats_app_banner