Sai Tamhankar : जे कठीण वाटत होतं, ते झालं! सई ताम्हणकरने दिली ब्रेकअपची जाहीर कबुली; म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sai Tamhankar : जे कठीण वाटत होतं, ते झालं! सई ताम्हणकरने दिली ब्रेकअपची जाहीर कबुली; म्हणाली...

Sai Tamhankar : जे कठीण वाटत होतं, ते झालं! सई ताम्हणकरने दिली ब्रेकअपची जाहीर कबुली; म्हणाली...

Oct 28, 2024 09:23 PM IST

Sai Tamhankar confirms breakup: अभिनेत्री सई ताम्हणकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत होती.अखेर तिने स्वतः यावर भाष्य केलं आहे.

Sai Tamhankar confirms breakup with Anish
Sai Tamhankar confirms breakup with Anish

Sai Tamhankar confirms breakup with Anish: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली आघाडीची मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिच्या दीर्घकालीन बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केले आहे. सई ताम्हणकरने स्वत: तिच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पहिले लग्न तुटल्यानंतर, सई चित्रपट निर्माता अनिश जोगला डेट करत होती. गेले अनेक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. तर चाहते त्यांच्या लग्नाच्या बातमीची वाट बघत होते. मात्र, आता या अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी, अभिनेत्रीने एक अशी पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते की, 'मी माझ्या इच्छेने सिंगल राहिले आहे. कदाचित ही माझी इच्छा नसेलही, परंतु तरीही माझ्यासाठी हा एक पर्याय आहे.’ सईच्या या पोस्टनंतरच त्यांच्या ब्रेकअपची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण, आता स्वतः अभिनेत्रीनेच तिच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आहे.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

ब्रेकअपच्या बातमीला सईने दिला दुजोरा!

सई ताम्हणकरने आता 'एचटी सिटी'शी बोलताना ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ब्रेकअपची पुष्टी करताना अभिनेत्री म्हणाली, 'होय, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा आमचा परस्पर संमतीने घेतलेला निर्णय आहे. हो हे थोडे अवघड होते, पण ते घडले. पण, तो माझ्या आयुष्यातील एक अतिशय खास व्यक्ती आहे आणि नेहमीच असेल. मी त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि मला माहित आहे की, त्यालाही माझ्याबद्दल असेच वाटत असेल.’

आधी लग्नही मोडलं!

सईच्या आयुष्यात प्रेमभंग होण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी सईचं लग्न झालं होतं. मात्र, त्या नात्यातही त्यांना अपयश आलं. सई आधीच घटस्फोटित आहे. तिचे पहिले लग्न अवघ्या २ वर्षांतच तुटले होते. सईने २०१३मध्ये व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केले. पण, २०१५ मध्येच अमेय आणि सईचा घटस्फोट झाला. अमेयपासून विभक्त झाल्यानंतर ही अभिनेत्री जोगसोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर, सई आणि अनिशने ‘वायझेड’, ‘गर्लफ्रेंड’ आणि ‘धुरळा’ या सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अनिश जोग हा एक प्रसिद्ध फिल्म मेकर आहे.

Whats_app_banner