sai tamhankar : ‘भूमिका मिळेल, पण तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल’; सई ताम्हणकरला कुणी केला होता मेसेज?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  sai tamhankar : ‘भूमिका मिळेल, पण तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल’; सई ताम्हणकरला कुणी केला होता मेसेज?

sai tamhankar : ‘भूमिका मिळेल, पण तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल’; सई ताम्हणकरला कुणी केला होता मेसेज?

Jun 30, 2024 01:27 PM IST

Sai Tamhankar Casting Couch: आजघडीला सई ताम्हणकर मनोरंजन विश्वात अतिशय प्रसिद्ध असली, तरी सुरुवातीच्या काळात तिला खूप स्ट्रगल करावा लागला होता.

सई ताम्हणकरला कुणी केलेला मेसेज?
सई ताम्हणकरला कुणी केलेला मेसेज?

Sai Tamhankar Casting Couch: मराठी मनोरंजन विश्व गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सईने आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. नुकताच सई ताम्हणकर हिचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने तिने हटके अंदाजात सेलिब्रेशन देखील केलं. नुकतीच तिने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिने एका कास्टिंग काउचच्या प्रसंगाचा खुलासा देखील केला.

मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या प्रकारांना सामोरे जावंच लागतं. अनेक कलाकार कास्टिंग काउच प्रकरणांचा जाहीर रित्या खुलासा देखील करतात. गेल्या काही काळात बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री, कलाकार कास्टिंग काउचसारख्या किळसवाण्या प्रकाराबद्दल समोर येऊन खुलेपणाने भाष्य करताना दिसले आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेदेखील अशाच एका प्रकारणाबद्दल खुलासा केला आहे. आजघडीला सई ताम्हणकर मनोरंजन विश्वात अतिशय प्रसिद्ध असली, तरी सुरुवातीच्या काळात तिला खूप स्ट्रगल करावा लागला होता. सई ताम्हणकर हिला देखील कास्टिंग काउचच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, नेहमीच बिंधास आणि बेधडक असलेल्या सईने तेव्हा देखील अतिशय खंबीरपणे या प्रकरणाला तिथेच थांबवण्यात यश मिळवलं होतं. सई बरोबर काय झालं होतं हे तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Bigg Boss OTT 3: अनिल कपूरने उघड केला शिवानी कुमारीचा खोटेपणा, सर्वांसमोर आणले सत्य!

सई ताम्हणकरने दिलेलं बेधडक उत्तर!

सई ताम्हणकर हिने कुठल्याही गॉडफादरची मदत न घेता मनोरंजन विश्वात आपलं हक्काचे स्थान निर्माण केलं. सांगलीसारख्या भागातून मुंबईत आलेला सई ताम्हणकर हिने मनोरंजन विश्वात स्थिरस्थावर होण्यासाठी बरेच कष्ट केले. सिनेसृष्टीत काम करताना सई ताम्हणकरला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला होता. याच काळात तिच्यासोबत कास्टिंग काऊचा प्रकार देखील घडला होता. अगदी करिअरच्या सुरुवातीच्या काळात सई ताम्हणकरला एका प्रोडक्शनमधून मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये तिला सांगण्यात आलं होतं की, ‘ही भूमिका तुमच्यासाठी आहे आणि ती तुम्हाला मिळेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल.’

असा मेसेज वाचून सई ताम्हणकर भलतीच चिडली होती. काहीही विचार न करता सईने थेट त्याच मेसेजला रिप्लाय करून ‘हा मेसेज तुझ्या आईला पाठव किंवा बाबांना पाठव’, असं उत्तर दिलं होतं. इतकंच नाही, तर मला परत असा मेसेज किंवा फोन करू नकोस, अशी तंबी ही सई ताम्हणकर हिने त्या व्यक्तीला दिली होती. पंधरा-वीस वर्षांच्या करिअरमध्ये सईला हा केवळ एकच मेसेज आला होता. यानंतर असं कधी झालं नाही. ही मेसेज करणारी व्यक्ती कोण होती? काय करते? याचा कसलाही विचार न करता सईने बेधडकपणे या गोष्टीला नाकारलं होतं.

Whats_app_banner