मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी संधी मात्र प्रेक्षकांना फार मिळाली नाही. 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या माध्यमातून ही भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलप प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील सई आणि सिद्धार्थच्या किसिंग सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाच्या २ मिनिटे ३९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ व सईची जोडी धम्माल करताना पाहायला मिळत आहे. श्रीदेवी ही चित्रपट वेड्या, फिल्मी म्हणाव्या अशा कुटुंबातील मुलगी. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही श्रीदेवीच्या नावाप्रमाणेचं अगदी फिल्मी अशी असतात. अशा कुटुंबात वाढलेली श्रीदेवी, तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही लव मॅरेज या संकल्पनेवर दांडगा विश्वास त्यामुळे त्यांना अरेंज मॅरेजचे वावडे. तर एका सर्वसामान्य घरातील मुलगा प्रसन्न. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मुलगा वयात आला की त्याच वेळेत लग्न होणे ते लग्न न केल्यामुळे मुलगा वाया जातो की काय अशी घरातल्यांची एकंदरीतच भीती त्यामुळे वयात आलेल्या प्रसन्नच्या मागे लग्न कर लग्न कर असा ससेमिरा लावणारे त्याचे कुटूंबिय. अशा वेगळ्या कुटुंबातून आलेल्या श्रीदेवी आणि प्रसन्न यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवर होते त्यानंतर दोघे एकमेकांना भेटतात व त्यानंतरची भन्नाट धम्माल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
वाचा: जया बच्चन पापाराझींशी असं का वागतात? रणबीर कपूरच्या आईने केली पोलखोल!
विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून सुलभा आर्या या सईच्या फिल्मी आज्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत त्याचबरोबर सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.