गेल्या काही दिवसांपासून 'रामायण' या चित्रपटाची चर्च रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर साईने वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. साईने खरच मांसाहार सोडला का चला जाणून घेऊया...
बुधवारी साई पल्लवीने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक लांबलचक चिठ्ठी लिहून रामायणातील सीतेची भूमिका साकारण्यासाठी शाकाहारी झाल्याच्या बातमीचा निषेध केला. "बहुतेक वेळा, आजकाल तर नेहमीच मी पसरवल्या जाणाऱ्या बिनबुडांच्या, कोणताही हेतू नसलेल्या अफवांवर वक्तव्य करणे टाळते. मी अनेकदा गप्प राहणे पसंत करते. पण हा अफवा मोठ्या प्रमाणावर पसरु लागल्या की मी प्रतिक्रिया देण्याची वेळ येते. या गोष्टी खास करुन माझ्या एखाद्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी किंवा एखाद्या नव्या सिनेमाच्या घोषणेच्या वेळी घडताना दिसतात. पुढच्या वेळी अशा काही बातम्या किंवा चुकीची माहिती देणारे पेज दिसले तर मी थेट कायदेशीर कारवाई करेन" या आशयाची पोस्ट साईने केली आहे.
एका तमिळ दैनिकात म्हटले आहे की, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मांसाहार सोडला आहे. तसेच प्रवासादरम्यान ती तिच्यासोबत स्वयंपाकी टीम घेऊन फिरते. ही टीम साईसाठी केवळ शाकाहारी जेवण बनवते असा दावादेखील या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
साईने एका मुलाखतीमध्ये ती शाकाहारी असल्याचे सांगितले आहे. 'मी कायम शाकाहारी आहार घेते. मी आयुष्यात कोणालाच मारु शकत नाही. खाण्यासाठी कोणाला तरी मारणे हा विचारही माझ्या डोक्यात येऊ शकत नाही' असे साई म्हणाली होती.
वाचा: शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज
साई पल्लवी शेवटचा तामिळ बायोग्राफिकल अॅक्शन चित्रपट अमरनमध्ये दिसली होती. शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या इंडियाज मोस्ट फियरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता. शिवकार्तिकेयन मेजर मुकुंद वरदराजन यांच्या भूमिकेत होता. तर राहुल बोस आणि भुवन अरोरा हे कलाकार या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. आता ती नितेश तिवारीच्या रामायण या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रवी दुबे, सनी देओल आणि कन्नड सुपरस्टार यश यांच्याप्रमुख भूमिका असून हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या