मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sahil Khan: वयाच्या ४७व्या वर्षी ‘स्टाईल’ फेम अभिनेत्याने केले दुसरे लग्न? रोमँटिक व्हिडीओ होतोय व्हायरल

Sahil Khan: वयाच्या ४७व्या वर्षी ‘स्टाईल’ फेम अभिनेत्याने केले दुसरे लग्न? रोमँटिक व्हिडीओ होतोय व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2024 10:29 AM IST

Sahil Khan Second Wedding: या व्हायरल व्हिडीओत दिसणारी ही मुलगी दुसरी कुणी नसून, साहिल खानची दुसरी पत्नी असल्याचे म्हटले जात आहे.

Sahil Khan Second Wedding
Sahil Khan Second Wedding

Sahil Khan Second Wedding: 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' या बॉलिवूड चित्रपटांतून लोकप्रिय झालेला अभिनेता साहिल खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीसोबत रोमान्स करताना दिसला आहे. व्हिडीओत दिसणारी ही मुलगी दुसरी कुणी नसून, साहिल खानची दुसरी पत्नी असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच साहिलचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, साहिल खानने वयाच्या ४७व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. स्वत: अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलीसोबत रोमान्स करताना दिसला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने ही आपली पत्नी असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही खूप रोमँटिक अंदाजात दिसले आहेत. मात्र, साहिल खानने त्याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल फारशी माहिती शेअर केलेली नाही.

BAFTA Awards 2024: ‘बाफ्टा पुरस्कार २०२४’मध्ये कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी

सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल!

अभिनेता साहिल खान आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीचा हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी खूपच सुंदर दिसत आहे. तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये, साहिल पांढऱ्या जॅकेटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर, त्याची पत्नी लाल गाऊनमध्ये अगदी राजकुमारीसारखीच दिसत आहे. या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स आता या जोडीचे अभिनंदन करत आहेत.

अभिनेत्याचे पहिले लग्न मोडले!

अभिनेता साहिल खानने २००३मध्ये अभिनेत्री निगार खानशी लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे लग्नाचे नाते फार काळ टिकू शकले नाही. २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित सगळ्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याच्या पोस्टमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

साहिल खान याने २००१मध्ये 'स्टाईल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. यानंतर हा अभिनेता 'एक्सक्यूज मी', 'डबल क्रॉस', 'अलादीन' सारख्या काही चित्रपटांमध्ये देखील झळकला. पण, त्याच्या करिअरला फारसे यश मिळाले नाही. यानंतर अभिनेता इंडस्ट्री सोडून बिझनेसमन झाला. आता साहिल खानने एक कंपनी सुरू केली आहे. त्याची कंपनी फिटनेस सप्लिमेंट्स बनवण्याचे काम करते.

WhatsApp channel

विभाग