ओटीटी विश्वातील सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजे 'सेक्रेड गेम्स.' ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. ही सीरिज चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरली. या सीरिजमधील इंटिमेट सीन्स आणि कलाकारांचे डायलॉग प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसले. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेने भूमिका साकारली होती. या सीरिजमुळे तिला पॉर्न अभिनेत्री असा टॅग मिळाला असल्याचे तिने सांगितले.
सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली. गणेश गायतोंडेची पत्नी सुभद्रा ही भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने साकारली आहे. सुभद्रा आणि गणेश गायतोंडेचे काही इंटिमेट सीन्स सीरिजमध्ये आहेत. या सीन्सबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजश्री देशपांडेने सांगितले.
वाचा: 'मुलं होणं गरजेचे नाही', तनिषा मुखर्जीने केले होते मोठे वक्तव्य
“सेक्रेड गेम्समधील सीन व्हायरल झाला आणि तो मॉर्फ झाला, तो सर्वत्र वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आला. माझ्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट्स लिहिल्या गेल्या,” असे राजश्री म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "नवाज सुद्धा त्या सीरिजचा भाग होता, त्याला कोणी प्रश्न विचारला नाही, कोणी अनुराग कश्यपलाला देखील प्रश्न विचारले नाही की, तू हा सीन का केलास? असा प्रश्न फक्त मलाच विचारला गेला. अनेकांनी मला 'पॉर्न अॅक्टर' असा टॅग दिला, आज माझी संपूर्ण ओळख फक्त सेक्रेड गेम्सची अभिनेत्री म्हणूनच आहे. ट्रायल बाय फायर या माझ्या वेब सीरिजमुळे देखील मला सेक्रेड गेम्स एवढी प्रसिद्धी मिळाली नाही."