Navra Maaza Navsaacha 2: प्रवासाला येताय ना? "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित-sachin pilgaonkar upcoming movie navra maaza navsaacha 2 teaser is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Navra Maaza Navsaacha 2: प्रवासाला येताय ना? "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Navra Maaza Navsaacha 2: प्रवासाला येताय ना? "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 15, 2024 11:26 AM IST

Navra Maaza Navsaacha 2 Teaser: गेल्या काही दिवसांपासून "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Navra Maaza Navsaacha 2 Teaser
Navra Maaza Navsaacha 2 Teaser

Navra Maaza Navsaacha 2 Teaser is Out: मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा.' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता प्रदर्शनाला २० वर्षे उलटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काय आहे टीझर?

"नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. "नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा २" मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत आहे. दोन चोरांनी सरकारी तिजोरीमधून हिरे चोरले आहेत. तसेच ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटींचे झाल्याचे दिसत आहेत. गेल्या वेळी एक पुतळा बसने घेऊन जाण्यात आला होता यावेळी गणपती बाप्पाची मूर्ती स्वप्नील जोशीच्या हातात दिसत आहे. 

कोणते कलाकार दिसणार?

"नवरा माझा नवसाचा २" चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.
वाचा: बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारला बिग बॉसची ऑफर, एका भागासाठी निर्माते देणार होते ३.५ कोटी

"नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाविषयी

"नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा २" मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी अजुन रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पहायला लागणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.