बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपट 'शोले' हा १९७५ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दशके उलटली आहेत. तरीही आज प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने पाहाताना दिसत आहेत. 'शोले' या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, जया बच्चन, हेमा मालिनी आणि अमजद खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले आहे. पण ४९ वर्षांनंतर, अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शोले चित्रपटाबाबत आश्चर्यजनक खुलासा केला आहे.
सचिन पिळगावकर यांनी नुकताच 'खाने मै क्या है' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शोले चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारणाऱ्या सचिन यांनी चकीत करणारी माहिती सांगितली आहे. 'रमेश सिप्पी हे केवळ अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांच्याशी संबंधीत सीन शूट करण्यासाठीच सेटवर येत असतं' असे सचिन म्हणाले. ते ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, “रामेशजींनी काही अॅक्शन सीन्ससाठी दुसरे युनिट ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे युनिट मुख्य कलाकार नसणारे सीन शूट करत असते. त्यांनी पासिंग सीन शूट केले होते. या कामासाठी त्यांनी स्टंट फिल्म दिग्दर्शक मोहम्मद अली भाई यांना कामावर ठेवले होते. तो एक प्रसिद्ध स्टंट फिल्म निर्माता होता. त्याच्यासोबत अॅक्शन दिग्दर्शक अजिम भाई देखील काम करत होते. नंतर दोन लोकांना, जिम आणि जेरीला हॉलिवूडमधून बोलावण्यात आले. आणखी दोन लोकांना बोलावण्याते आले होते जे त्यांचे प्रतिनिधित्व करतील. कारण हे लोक देशाबाहेरून आले होते, त्यांना कसे कळणार नेमकं काय सुरु आहे. सेटवर सर्वजण काम करत होते. संपूर्ण यूनिटमध्ये केवळ दोन लोक ही बिनकामी होती. एक म्हणजे अमजद खान आणि दुसरा मी."
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
सिप्पी यांना अमजद खानच्या दिग्दर्शनासाठीच्या आवडीची चांगली माहिती होती. त्यामुळे त्यांनी अमजद खान यांना चित्रपटात घेण्यात आले होते. 'चित्रपटात दाखवण्यात आलेला चोरीचा सीन हा रमेश सिप्पी सेटवर नसताना शूट केला आहे. ते सामान्यत: धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, आणि संजीव कुमार यांच्या सीनसाठी केवळ सेटवर यायचे. बाकीचे शूटिंग हे सेटवरील यूनीट करत असत' अशी माहिती सचिन पिळगावकर यांनी दिली.