बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. त्याने फिटनेस आणि डान्स कौशल्याच्या आधारावर प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच हृतिकने त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी हृतिकसाठी शुभेच्छांच्या पोस्ट लिहिल्या होत्या. दरम्यान, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने देखील एक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक आणि सबा हे बाल्कनीत उभे राहिलेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही लिप लॉक करताना दिसत आहेत. या रोमँटिक व्हिडीओला सबानं खास कॅप्शन देखील दिलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह." सबा आझादने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वाचा: बालपणी 'या' समस्येचा सामना केलेला हृतिक आज आहे सुपरस्टार!
हृतिकची एक्स वाईफ सुझान खानने देखील खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुझान खाननं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हृतिक आणि त्याच्या मुलांचे काही खास फोटो आहेत. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू ५० व्या वर्षी देखील ३० वर्षाचा दिसतो" असे कॅप्शन दिले आहे.
हृतिक रोशन लवकरच 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटामध्ये तो दीपिका पदुकोणसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट जानेवारीतच प्रदर्शित होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.