मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिक्कीमच्या चिमुकलीने जिंकलं ‘सारेगमप’चं विजेतेपद; ट्रॉफीसह मिळवली ‘इतकी’ रक्कम!

सिक्कीमच्या चिमुकलीने जिंकलं ‘सारेगमप’चं विजेतेपद; ट्रॉफीसह मिळवली ‘इतकी’ रक्कम!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 11:11 AM IST

Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: नुकताच ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’चा महाअंतिम सोहळा पार पडला. यात सिक्कीमच्या जेत्सन डोना लामा हिने विजेत पद पटकावत ट्रॉफी मिळवली आहे.

jetshen lama
jetshen lama

Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: छोट्या पडद्यावर लहान मुलांचे अनेक शो सध्या प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहेत. अशाच शो पैकी एक म्हणजे ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’. या शोमध्ये चिमुकल्या स्पर्धकांनी आपल्या मधुर आवाजांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. यात सिक्कीमच्या जेत्सन डोना लामा हिने विजेत पद पटकावत ट्रॉफी मिळवली आहे. ट्रॉफीसोबतच जेत्सन हिने १० लाख रुपयांचे रोख बक्षीसही जिंकले आहे.

या संपूर्ण सीझनमध्ये सिक्कीमची जेत्सन तिच्या गाण्याव्यतिरिक्त बोलण्याच्या शैलीमुळे देखील चर्चेत राहिली आहे. जेत्सन अतिशय हळुवारपणे आणि प्रेमाने बोलायची. मात्र, तिने तिच्या उत्कृष्ट आणि धमाकेदार गायनाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या शोच्याग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांनी अनेक जबरदस्त परफॉर्मन्स दिले आणि जेत्सन ट्रॉफीसह १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्यात यशस्वी झाली. तर, हर्ष सिकंदर व ज्ञानेश्वरी घाडगे हे दोन्ही स्पर्धक उपविजेते ठरले आहेत.

महाअंतिम फेरीची सुरुवात टॉप ६ फायनलिस्ट हर्ष सिकंदर, ज्ञानेश्वरी घाडगे, जेत्सन लामा, अथर्व बक्षी, राफा यास्मीन आणि अतनु मिश्रा यांनी केली. यानंतर केवळ हर्ष सिकंदर, ज्ञानेश्वरी घाडगे आणि जेत्सन लामा यांना पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवता आले. स्पर्धकांव्यतिरिक्त, नीती मोहन आणि शंकर महादेवन यांनीही अंतिम फेरीत आपल्या गायनाने सर्वांना थक्क केले. तर, जॅकी श्रॉफ, अनुराग कश्यप आणि अमित त्रिवेदी देखील फिनाले एपिसोडमध्ये दिसले.

'माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. खरे सांगायचे तर, स्पर्धा कठीण होती. कारण या सीझनमध्ये बरेच प्रतिभावान स्पर्धक होते आणि त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. या शोमध्ये येऊन मला खूप काही शिकायला मिळाले. मी माझ्या सर्व मार्गदर्शकांची देखील आभारी आहे. इथून मी माझ्यासोबत खूप आठवणी घेऊन जात आहे आणि आता मी माझ्या गायनाच्या नव्या प्रवासाची आतुरतेने वाट पाहत आहे’, असे जेत्सन म्हणाली.

IPL_Entry_Point

विभाग