मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आता हे काय...?', प्राजक्ता माळीचा रानबाजारनंतर 'तो' फोटो चर्चेत
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी (HT)
20 May 2022, 5:24 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 5:24 AM IST
  • प्राजक्ता माळी आणि ऋतुजा बागवेचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांना ‘आता हे काय?’ असा प्रश्न पडला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या चर्चेत आहे. या चर्चा 'रानबाजार' या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या. या सीरिजमध्ये प्राजक्ता बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिला या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशातच प्राजक्ताचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी 'आता हे काय?' असा प्रश्न विचारला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारा प्राजक्ता माळीचा हा फोटो अभिनेत्री ऋतुजा बागवेसोबतचा आहे. या फोटोमध्ये त्या दोघी एकमेकींकडे पाहात असून एकदम जवळ उभ्या आहेत. हा फोटो ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि प्राजक्ता माळीच्या रिसपेक्ट नावाच्या चित्रपटातील आहे. या चित्रपटात दोघी वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

प्राजक्ताचा रिसपेक्ट हा चित्रपट २२ मे रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून झी टॉकीजवर देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सहा वेगवेगळ्या स्त्रीयांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मेघालय येथे झाले आहे. ऋतुजा बागवेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील हा फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो चर्चेत असून अनेकांनी त्यावर कमेंट करत, 'आता हे काय?' असे म्हटले आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook