मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 02, 2024 06:33 PM IST

मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडेने सोशल मीडियावर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले असून त्यावर कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष
गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून गौरी नलावडे ओळखली जाते. तिची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका विशेष गाजली होती. तिचे वैदेही हे पात्र प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. या मालिकेनंतर गौरी फारशी छोट्या पडद्यावर सक्रिय नसल्याचे पाहायला मिळाले. तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास पसंती दर्शवली. आता गौरी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टवर मराठी कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.

गौरी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. कधी वेस्टर्न कपडे घालून तर कधी पारंपरिक पेहराव करुन गौरी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहते लाइक्सचा देखील वर्षाव करत असतात. नुकताच गौरीने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने मोनोकिनी परिधान करुन हे फोटो शेअर केले आहेत.
वाचा: एक दिवस अचानक मालिकेतून काढलं; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा खुलासा

गौरीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुलाबी रंगाची मोनोकिनी परिधान केलेला स्विमिंगपूलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौरी अतिशय हॉट दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच गौरीची अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा बागवेने केलेल्या कमेंटने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाचा: संघर्षयोद्धा ते जुनं फर्निचर, एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची मेजवानी

गौरी आणि ऋतुजा यांची मैत्री जगजाहिर आहे. त्या अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. गौरीच्या स्विमिंग पुलमधील फोटोवर ऋतुजाने फर्ल्टी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. “सुपर हॉट” म्हणत ऋतुजाने फायर इमोजी वापरला आहे. इतक्यावरच न थांबता “काश मैं लडका होता”, अशी कमेंटही ऋतुजाने गौरीच्या हॉट फोटोवर केली आहे. ऋतुजची ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

गौरी नलावडेच्या कामाविषयी

अभिनेत्री गौरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा 'गोदावरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने एकदम हटके भूमिका साकारली. त्यापूर्वी तिने ‘टर्री’, ‘कान्हा’, ‘अधम’, ‘फॅमिली कट्टा’, ‘द ब्रोकन टेबल’ या काही चित्रपटांमध्ये काम केले. गौरी यासोबतच काही हिंदी चित्रपटांमध्ये ही झळकली होती. गौरीच्या आगामी चित्रपटाविषयी सध्या कोणती माहिती समोर आलेली नाही.

WhatsApp channel

विभाग