“खरं बोलण्याची शिक्षा", ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचे वक्तव्य
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  “खरं बोलण्याची शिक्षा", ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचे वक्तव्य

“खरं बोलण्याची शिक्षा", ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचे वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 28, 2024 08:12 AM IST

अभिनेत्री रुपाली गांगुलीने मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर सावत्र मुलगी ईशा वर्माने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी केले होते. तसेच तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

rupali ganguly
rupali ganguly

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अनुपमा मधील अभिनेत्री रुपाली गांगुली ही खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रुपालीवर तिची सावत्र मुलगी ईशा वर्माने अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रीने ईशाविरोधात पुन्हा ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. त्यानंतर ईशाने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केले. आता ईशा पुन्हा एकदा या प्रकरणावर बोलली आहे. तिने रुपालीचा खरा चेहरा आता समोर आला आहे असे म्हटले आहे.

ईशाने जारी केले निवेदन

ईशाने या प्रकरणात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात तिने म्हटले आहे की, 'सर्वांना नमस्कार. मी, ईशा वर्मा आणि मी या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या वडिलांना माझी वैयक्तिक गोष्ट सांगण्याचा एक कठीण निर्णय घेतला होता. त्या निर्णयाने सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली आणि मी लोकांच्या नजरेत आलो. मी केलेली ही सर्वात कठीण गोष्ट होती, परंतु ती माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होती. त्यामुळे मला थोडं शात झाल्यासारखे वाटले. मला माहित होते की याचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या मित्रांवर आणि जवळच्या लोकांवर देखील होईल. तरही मी हे सर्व काळजीपूर्व हाताळण्याचा प्रयत्न केला."

Isha Statement
Isha Statement

ईशाने सांगितली वडिलांची प्रतिक्रिया

पुढे ईशा म्हणाली की, "मी २४ वर्षांची आहे. माझा अनुभव शेअर करणे हा माझा स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा मार्ग होता. माझा हेतू कुणाचेही नुकसान करण्याचा नव्हता, फक्त माझा अनुभव शेअर करण्याचा होता."ईशाने पुढे रुपाली आणि तिचे वडील अश्विन यांच्याबद्दल लिहिले की, 'लहान मूल असले तरी सत्य बोलल्याबद्दल मुलाला कधीही शिक्षा होऊ नये. मी अजूनही माझ्या वडिलांची मुलगी आहे. माझ्या विधानाबद्दल त्यांची प्रतिक्रिया अत्यंत चुकीची होती आणि यावरून त्यांचे खरे चरित्र समोर आले."
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

सोशल मीडिया अकाऊंट केले डिलिट

त्यानंतर ईशाने रुपालीच्या मुलाबद्दल लिहिले की, 'मी माझ्या वक्तव्यात कधीही अल्पवयीन मुलाचा सहभाग घेतलेला नाही. मी जे शेअर केले ते तथ्यपूर्ण होते. मला माहित होते की ६ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांचे लग्न झाले आणि त्याच वर्षी २५ ऑगस्ट रोजी त्यांना एक मूल झाले. याशिवाय बाकी ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्या माझ्या इनपुट नव्हत्या. मी नुकताच माझा अनुभव सांगितला. त्यानंतर मी माझे सोशल मीडिया अकाऊंट कोणत्याही भीतीपोटी नव्हे तर मला वाटले म्हणून डिअॅक्टिव्हेट केले. मला जे म्हणायचे आहे ते मी सांगितले आहे. हे निवेदन केवळ काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी जारी करण्यात आले होते. मी कोणतीही मुलाखत देणार नाही आणि चर्चाही करणार नाही.'

Whats_app_banner