दुश्मनीला बाबू घाबरत नाय, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाले पाहिजे; 'बाबू'चा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दुश्मनीला बाबू घाबरत नाय, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाले पाहिजे; 'बाबू'चा ट्रेलर प्रदर्शित

दुश्मनीला बाबू घाबरत नाय, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाले पाहिजे; 'बाबू'चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 20, 2024 08:29 AM IST

'बाबू' या चित्रपटात अभिनेत्री रुचिरा जाधव आणि अंकित मोहन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Babu Movie
Babu Movie

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. या चित्रपटाचे नाव 'बाबू' असे आहे. बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणाऱ्या स्टायलिश 'बाबू'ची ही कथा आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोश मीडियावर चर्चेत आहे.

बाबू चित्रपटाच्या २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एका रेती मफीयाची कथा दाखवण्यात आली आहे. त्याला इतर माफीयांमुळे होणारा त्रास. या दुश्मिनीचा खासगी आयुष्यावर होणारा परिणाम, त्यानंतर सगळ्यातून सावरलेल्या बाबूची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात बाबू हा आग्री कोळी दाखवण्यात आला आहे. आता बाबूच्या आयुष्याच पुढे काय होणार हे पाहणयासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.

बाबू या चित्रपटात अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे.
वाचा: 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, " मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’

Whats_app_banner