Viral Video: रॅम्पवर वॉक करत असताना अभिनेत्रीचा घसरला पाय, नंतर तिने केलेल्या कृत्याने जिंकली मने
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: रॅम्पवर वॉक करत असताना अभिनेत्रीचा घसरला पाय, नंतर तिने केलेल्या कृत्याने जिंकली मने

Viral Video: रॅम्पवर वॉक करत असताना अभिनेत्रीचा घसरला पाय, नंतर तिने केलेल्या कृत्याने जिंकली मने

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 10, 2024 05:24 PM IST

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा रॅम्पवर वॉक करत असताना पाय घसरला आहे. त्यानंतर तिने जे काही केले त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

Rubina Dilain
Rubina Dilain

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रॅम्पवर वॉक करताना दिसत आहे. पण अचानक वॉक करत असताना तिचा पाय घासरतो. पण ती रॅम्पवरुन पडतापडता वाचते. त्यानंतर अभिनेत्रीने जे काही केले ते लक्ष वेधी ठरले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रुबीना दिलैक आहे. तिचा रॅम्पवर वॉक करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुबीना रॅम्पवॉक करताना दिसत आहे. रुबीना वॉक करताना पडतापडता वाचली आहे. पण आत्मविश्वास न गमावता ती पुन्हा उभी राहाते. हा व्हिडिओ पाहून रुबिनाचे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत. मात्र काही लोक सोशल मीडियावर रुबिनाला ट्रोलही करत आहेत. रुबीना किती ओव्हर अॅक्टिंग आहे असं म्हणत काही लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

गुलाबी रंगाच्या लेहंगामध्ये रुबीनाचा रॅम्प वॉक

रुबिनाचा हा व्हिडिओ अर्चना कोचरच्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रुबीनाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडीओमध्ये रुबीना रॅम्पवॉक करत पुढे जात असताना तिचा लेहंगा तिच्या पायाखाली येताना दिसत आहे. त्यामुळं रुबीना डगमगते. यानंतर रुबीना थांबते. पायातील चप्पल काढते आणि हातात घेते. पुन्हा आत्मविश्वासाने चालायला सुरुवात करते.

सोशल मीडिया युजर्स काय म्हणतात?

रुबिनाच्या या व्हिडीओवर चाहते तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. या घटनेनंतरही रुबीनाने इतक्या आत्मविश्वासाने आपला वॉक पूर्ण केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, रुबीना ओव्हर अॅक्टिंग करत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. काही युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं- ओव्हर एक्टिंग शॉप. तर एका युजरने लिहिले की, रुबीनाने हे जरा जास्तच केले. आणखी एका युजरने लिहिले की, अतिआत्मविश्वासही तुम्हाला खाली पडू शकतो.
Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू

रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती होती. रुबीनाला बिग बॉसच्या घरात पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला बॉस लेडीचा टॅग दिला. तर रुबीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आई झाल्यापासून टीव्हीपासून दूर आहे. ती स्वत:चा पॉडकास्ट चालवते.

Whats_app_banner