छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्री सतत तिचा कर्करोगाचा प्रवास आणि उपचार प्रक्रिया सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. कॅन्सरसारख्या कठीण काळात तिच्या धाडसाचे चाहते आणि सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे. सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक कमेंट करून तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. नुकताच हिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत १५ तासांची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे. आता अभिनेत्री आणि ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त रोजलिन खानने हिनाचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर हिनावर सहानुभूती आणि लोकांचे लक्ष वेधल्याचा आरोपही केला आहे.
हिना खान आपल्या आजाराबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा दावा रोसलिनने केला आहे. रोझलिनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, 'हिनाचे हे पाऊल केवळ सहानुभूती आणि लक्ष वेधण्यासाठी आहे. सेलिब्रिटींना स्वतःची लाज वाटली पाहिजे की ते कर्करोगासारख्या गंभीर विषयावर चुकीची माहिती पसरवत आहेत. मित्रांनो, कृपया अशा लोकांना पाठिंबा देऊ नका जे 5 डिसेंबरला शस्त्रक्रियेचा फोटो पोस्ट करतात आणि नंतर २१ डिसेंबरला प्रवास शेअर केला. आता दावा करतात की ही मास्टॅक्टॉमी होती?' असे म्हटले आहे.
पुढे ती म्हणाली, 'मला माफ करा, परंतु हे मानवीदृष्ट्या शक्य नाही. ही अभिनेत्री चर्चेत राहण्यासाठी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा वापर करतेय! ती तुम्हाला मोटिव्हेट करत नाहीये, ती फक्त तिच्या पीआर प्लॅनअंतर्गत पोस्ट करत आहे! आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि आपल्या ऑन्कोलॉजिस्टच्या सल्ल्याचे अनुसरण करा. कॅन्सरग्रस्त म्हणून मला माहित आहे की ही लढाई किती कठीण आहे. पण चुकीची माहिती पसरवून लोकांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही. अशा दाव्यांमुळे कॅन्सरचे इतर रुग्ण दिशाभूल होऊ शकतात.'
वाचा: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
या आरोपांवर हिना खानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हिना खानला काही महिन्यांपूर्वी स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, सुरुवातीच्या लक्षणांनंतर डॉक्टरांशी बोलले तेव्हा तपासणीमध्ये कर्करोग झाल्याचे आढळले. हिनाने या कठीण काळात सकारात्मक राहण्याबद्दल सांगितले आणि तिच्या कर्करोगाच्या प्रवासाला सामोरे जात आहे.
संबंधित बातम्या