'वर्दी पहननेवाले हर एक को लगता है वो सिंघम है', अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'वर्दी पहननेवाले हर एक को लगता है वो सिंघम है', अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

'वर्दी पहननेवाले हर एक को लगता है वो सिंघम है', अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 07, 2024 03:29 PM IST

Singham Again trailer: मल्टीस्टार 'सिंघम अगेन' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामधील 'वर्दी पहनने वाले हर एक को लगता है वो सिंघम है' हा डायलॉग व्हायरल होताना दिसत आहे.

Singham Again trailer
Singham Again trailer

Singham Again trailer: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटात अभिनेता अजय देवगणसह अनेक कलाकार दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. तुम्ही 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला नसेल तर नक्की पाहा...

काय आहे ट्रेलर?

'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या ४ मिनिटे ५८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अजय देवगचा स्वॅग पाहायला मिळत आहे. अजय देवगण हा त्याचा मुलगा आणि पत्नीसोबत गप्पा मारत असतो. तेव्हा त्याचा मुलगा प्रश्न विचारतो की तुम्हाला खरच वाटते की राम सीतेला सोडवण्यासाठी ३ हजार किलोमीटर लांब गेले असतील? त्यावर अजय देवगण म्हणतो की, 'मी ज्याच्यावर जीव लावतो त्याच्यासाठी जीवही ओवाळून टाकतो. पण ज्याच्याशी दुश्मनी घेतो त्याला सोडत नाही. एकदा गुगलवर बाजीराव सिंघम टाईप कर म्हणजे तुला तुझा बाप काय आहे हे कळेल.' त्यानंतर हळूहळू दीपिका पादूकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंग यांची एण्ट्री होते. त्यांच्या एण्ट्रीने ट्रेलर आणखी रंजक ठरत आहे.

ट्रेलरने रचला इतिहास

रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर ४ मिनिटे ५८ सेकंदाचा आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ट्रेलर आहे. याआधी एकही ट्रेलर ४ मिनिटांपेक्षा जास्त काळ झाला नाही. या अॅक्शन पॅक्ड ट्रेलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रवी किशन, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, श्वेता तिवारी आणि जॅकी श्रॉफ दिसत असून अनेक दमदार डायलॉग ऐकायला मिळाले आहेत.

ट्रेलरमधील हिट डायलॉग:

‘गूगल पर बाजीराव सिंघम टाइप कर ले पता चल जाएगा तेरा बाप चीज क्या है।’ - अजय देवगन

‘भारत की ये प्रथा रही है, सीता मां का हरण हुआ तो लंका जली है।’ - अजय

‘मैं सिंघम नहीं, मैं लेडी सिंघम है रे।’ - दीपिका

‘तेरे सामने जो खड़ा है वो महात्मा गांधी का आदर तो करता है, लेकिन पूजता छत्रपति शिवाजी महाराज को है।’ - अजय

‘तेरी रामायण का रावण हूं मैं’ - अर्जुन

‘जया दरवाजा तोड़।’ - करीना

‘ये कलयुग है कलयुग, इस बार रावण जीतेगा।’ - अर्जुन

दोन चित्रपट आमने सामने

यापूर्वी 'सिंघम अगेन' हा चित्रपट १५ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार होता. पण त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट धमाल उडवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपटही दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. तरी निर्मात्यांनी हा चित्रपट ठरलेल्या वेळेत म्हणजेच १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप

प्रदर्शनापूर्वीच कमावले कोट्यवधी रुपये

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन'चे सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राइट्स २०० कोटीरुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकले गेले आहेत. अशापरिस्थितीत अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची हा सर्वात मोठा नॉन थिएटर डील ठरला आहे.

Whats_app_banner