Rohit Bal : दोन आठवड्यांपूर्वी दाखवला फॅशनचा जलवा; प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rohit Bal : दोन आठवड्यांपूर्वी दाखवला फॅशनचा जलवा; प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

Rohit Bal : दोन आठवड्यांपूर्वी दाखवला फॅशनचा जलवा; प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

Nov 02, 2024 10:38 AM IST

Rohit Bal Death : अगदी दोन आठवड्यांपूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी रोहित यांनी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये 'कायनात: अ ब्लूम इन द युनिव्हर्स' हे कलेक्शन सादर केले. हा त्यांचा शेवटचा शो ठरला.

प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन! (AFP)

Rohit Bal Passes Away : प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. २०१०मध्ये आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. १९९६मध्ये त्यांना टाईम मासिकाने भारताचे 'मास्टर ऑफ फॅब्रिक अँड फॅन्टसी' म्हणून गौरवले होते. २००१ आणि २००४मध्ये आंतरराष्ट्रीय फॅशन अवॉर्ड्समध्ये रोहित बल यांची 'डिझायनर ऑफ द इयर' म्हणून निवड झाली होती. फॅशन डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे (एफडीसीआय) अध्यक्ष सुनील सेठी म्हणाले की, रोहित यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. यामुळे आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

याबद्दल माहिती देताना सुनील सेठी म्हणाले की, ‘रोहितवर सफदरजंग एन्क्लेव्ह येथील अश्लोक रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉ. आलोक चोप्रा बाल यांच्यावर उपचार करत होते. रोहितला शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. २ तास हे प्रयत्न सुरू केले, पण त्यांना वाचवता आले नाही.’ रोहित बल यांच्या निधनाने फॅशन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अगदी दोन आठवड्यांपूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी रोहित यांनी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये 'कायनात: अ ब्लूम इन द युनिव्हर्स' हे कलेक्शन सादर केले. हा त्यांचा शेवटचा शो ठरला. अभिनेत्री अनन्या पांडे या कार्यक्रमाची शो-स्टॉपर होती.

Deepika Daughter Name : लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने रणवीर-दीपिकाने दाखवली त्यांच्या ‘लक्ष्मी’ची झलक; नावही सांगितलं!

हॉलिवूड आणि बॉलिवूडकरांसाठी डिझाईन केले कपडे!

रोहित यांच्या निधनावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. रोहित यांच्यावर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी आजारपणामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिसेंबर २०२३मध्ये रोहित यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी २०२४च्या सुरुवातीला पुनरागमन केले होते. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील लॅक्मे इंडिया फॅशन वीक हा त्यांचा शेवटचा शो ठरला. आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत रोहित बल यांनी हॉलिवूड अभिनेत्री उमा थर्मन, सिंडी क्रॉफर्ड, नाओमी कॅम्पबेल आणि बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण, अर्जुन रामपाल आणि इतर स्टार्ससाठी कपडे डिझाईन केले होते. रोहित बल यांनी 'कौन बनेगा करोडपती' आणि ब्रिटिश एअरवेजच्या केबिन क्रूसाठीही पोशाख डिझाईन केले होते. टेनिस स्टार ॲना कुर्निकोव्हाने २००१मध्ये पॅरिस शोमध्ये रोहित यांचे कपडे परिधान करून रॅम्प वॉक केला होता.

कोण होते रोहित बल?

रोहितचा जन्म एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात ग्रॅज्युएशन केले. नंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झाले. येथे रोहितने पुढील शिक्षण पूर्ण केले. रोहितने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन कोर्स केला होता. यानंतर, १९८६मध्ये, त्यांनी आपल्या भावासोबत ऑर्किड ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून फॅशन उद्योगात आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

Whats_app_banner