Actor Mohan Babu House Theft: दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते मोहन बाबू यांच्या घरी चोरी झाली आहे. चोराने १० लाख रुपयांची रोख रक्कम चोरल्याची माहिती समोर आली होती. चोरी झाल्याचे कळताच मोहन बाबू यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यामध्ये नोकरानेच ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
मोहन बाबू हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी जवळपास ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेव्हा मोहन बाबू यांच्या घराच चोरी झाल्याची माहिती समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराला तिरुपती येथून अटक केली आहे. अभिनेत्याच्या घरातून नोकराने 10 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. आता या चोरी प्रकरणात नोकर दोषी असल्याचं पोलिस तपासात आढळलं आहे. पोलिसांना तपासामध्ये आढळून आलं की, ही रक्कम त्यांच्या एका घरगुती नोकराने चोरली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, मोहन बाबू हे तेलंगणामधील जलपल्ली गावात आपल्या कुटुंबासोबत राहतात. या राहत्या घरातून २२ सप्टेंबर रोजी चोरी झाली. ही चोरी मोहन बाबू यांच्या घरात काम करणाऱ्या वदिते गणेश नाईक या नोकराने केली आहे. हा नोकर मोहन बाबू यांच्यासोबत ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्यानंतर तो घरकामाला ही मदत करत असे. पण घरात चोरी झाल्याचे कळताच मोहन बाबू यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा वदिते गणेश नाईक हा आरोपी अढळला.
एक दिवशी मोहन बाबूच्या सचिवाने तिरुपतीच्या यात्रेहून परतताना 10 लाख रुपये रोख रक्कम घरी आणली. त्यांनी खोलीत पैसे ठेवले, पण त्यांच्या खोलीतून रोख रक्कम चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.मीडिया रिपोर्टनुसार, मोहन बाबूच्या सचिवाने काही दिवसांपूर्वी पहारी शरीफ पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीला तिरुपती येथून अटक केली.
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
मोहन बाबू यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या निर्दशनास आले की रात्री उशिरा आरोपी त्यांच्या घरातून बाहेर पडताना आणि संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस पथके तयार केली. काही वेळातच तिरुपतीला गेलेल्या गणेश नाईकला अटक केली. त्याच्यावर BNS भांदवि कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडून ७.३ लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे.