Riteish Deshmukh Break Up Message: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनीलिया डिसूझा यांनी २०१२मध्ये लग्न केले होते. दोघेही बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जातात. जिनीलिया अनेकदा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रितेशचं कौतुक करताना दिसली आहे. आता एका मुलाखतीत जेनेलियाने रितेशसोबतच्या नात्याबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने एक किस्सा देखील शेअर केला. एकदा जेव्हा ती आणि रितेश डेटिंग करत होते तेव्हा रितेशने मध्यरात्री तिला ब्रेकअपचा मेसेज पाठवला होता.
श्रेया घोडावतच्या पॉडकास्टवर खास संभाषणादरम्यान जिनीलियाला विचारण्यात आले की, रितेशने कधी तिच्यावर प्रँक केला आहे का? यावर जिनीलिया म्हणाली की, ‘जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो, त्या दरम्यान एप्रिल फूल डे आला होता आणि त्याने मला मेसेज पाठवला की आमलं नातं संपलं, आणि मग तो सोपून गेला. तो खूप उशीरा झोपायचा आणि मी लवकर झोपायचे. रात्री एकच्या सुमारास त्याने मला मेसेज केला आणि झोपून गेला. रात्री अडीच वाजता मला तो मेसेज आला आणि मी त्याक्षणी नैराश्यात गेले. असं अचानक काय झालं ते समजत नव्हतं. असं मध्यरात्री कोण बोलतं?’
जिनीलिया पुढे म्हणाली की, ‘मी सकाळी नऊ वाजेपर्यंत अस्वस्थ होते. त्याला सकाळी जाग आली, पण त्याने रात्री काय केले, ते त्याच्या लक्षातच नव्हते. तो नेहमीप्रमाणे उठला, त्याने मला फोन केला आणि विचारले की मी काय करतेय… त्यावर मी त्याला म्हणाले की, मला वाटतं नाही की आपण आता बोलले पाहिजे. मला तुझ्याशी बोलायचे नाही. त्याने मला विचारलं की काय झालं. आणि मी म्हणालो की, तू जणू काहीच घडलं नाही असं वागत आहेस…’
यानंतर जिनीलियानेच रितेशला आठवण करून देत म्हटलं की, त्याने तिला रात्री ब्रेकअपचा मेसेज पाठवला होता. जिनीलियाने जेव्हा त्याला हा प्रकार घडल्याचे सांगितले, तेव्हा रितेशला ते आठवले आणि त्याने जिनीलियाला सांगितले की, हा मेसेज एप्रिल फूलचा विनोद आहे. यावर जिनीलिया चांगलीच वैतागली आणि रितेशला म्हणाली की, अशा प्रकारचा विनोद कोण करतं? यावर रितेशला अखेर माफी मागावी लागली होती.
संबंधित बातम्या