मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: कोर्टात भेटू...; रितेश देशमुखने पाठवली करीना कपूरला नोटीस, काय आहे प्रकरण?

Riteish Deshmukh: कोर्टात भेटू...; रितेश देशमुखने पाठवली करीना कपूरला नोटीस, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 19, 2022 12:43 PM IST

Kareena Kapoor Khan: सोशल मीडियावर अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो करीनाला कोर्टाची नोटीस देताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ

रितेश देशमुख
रितेश देशमुख (HT)

बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. रितेश हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो पत्नी, अभिनेत्री जिनिलिया डिसोजासोबत रिल्स तयार करुन शेअर करताना दिसतो. सध्या त्याने शेअर केलेल्या अभिनेत्री करीना कपूर खानच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करीनासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना समोरुन जाणाऱ्या एका व्यक्तीकडे पाहाते म्हणते, ‘कोण आहे तो ज्याने माझ्याकडे मागे वळून पाहिले नाही?’ त्यावर रितेश उत्तर देत, ‘तो कायदा आहे’ असे म्हणतो. त्यावर लगेच करीना त्याने मला नोटीस केले नाही असे म्हणते. तेवढ्यात रितेश तिच्या हातात कोर्टाची नोटीस देतो आणि म्हणतो 'कोर्टात भेटूया.' ती नोटीस पाहून करीनाला धक्का बसतो. रितेशने करीनाला कसली नोटीस दिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रितेशने हा व्हिडीओ शेअर करत 'लवकरच भेटूया करीना कपूर खान' असे म्हटले आहे. रितेशने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडीओ त्याच्या 'केस तो बनता है' या शोमधील आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींना कोर्टरुममध्ये उभे करुन त्यांच्यावरील आरोपांना उत्तरे द्यावी लागतात. या शोच्या आगामी भागामध्ये करीना कपूर दिसणार आहे. त्यासाठीच रितेशने हा मजेशीर प्रोमो तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रितेशचा ‘केस तो बनता है’ हा शो अॅमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित होतो. या शोमध्ये त्याच्यासोबत वरुण शर्मा दिसतो. वरुण शर्मा सेलिब्रिटींचा बचाव करताना दिसतो. तर कुशा कपिल जजच्या भूमिकेत दिसतो.

IPL_Entry_Point