मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: वडिलांच्या आठवणीत रितेश झाला भावूक, भाषण करताना अश्रू अनावर

Viral Video: वडिलांच्या आठवणीत रितेश झाला भावूक, भाषण करताना अश्रू अनावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 19, 2024 01:39 PM IST

Riteish Deshmukh Viral Video: सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश दिवंगत वडिल आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसत आहे.

Riteish Deshmukh
Riteish Deshmukh

Riteish Deshmukh Get Emotional: बॉलिवूडच नव्हे तर, मराठी मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. सध्या सोशल मीडियावर रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो लातूरमध्ये भाषण देत असताना वडिलांच्या आठवणीत भावूक झाला आहे.

रविवारी लातूरमध्ये एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्टॅच्यूचे अनावरण करण्यासाठी करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रितेश, त्याचा भाऊ अमित देशमुख, आई वैशाली देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात रितेशने भाषण दिले. भाषणात त्याने वडिलांनी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख केला आहे. दरम्यान बोलताना रितेशला अश्रू अनावर झाले आहेत. रितेशचे बोलणे ऐकून वैशाली देखील भावूक झाल्या आहेत.
वाचा: मी लक्षाच्या एका शब्दावर...; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत वर्षा उसगावकर भावूक

वडिलांविषयी बोलताना रितेश म्हणाला की, 'सध्याचे राजकारण फार वेगळे आहे. साहेबांच्या काळात राजकारण होते पण कधीही वैयक्तिक टीका केली जात नव्हती. वडिलांची उणीव आम्हाला नेहमीच भासते. पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले. काकांसमोर मी माझ्या मनातल्या भावना कधी व्यक्त केल्या नाहीत. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचे नाते कसे असावे याचे आम्ही ज्वलंत उदाहरण आहोत.' जेव्हा रितेश भाषण देत होता तेव्हा बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. तसेच आई वैशाली आणि भाऊ अमित देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

रितेशच्या कामाविषयी

गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुख मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारणार असल्याचे चर्चेत होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करून त्याने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.

IPL_Entry_Point