'बिग बॉस' म्हणजे मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. 'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन अभिनेता रितेश देशमुखमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचे स्पष्ट झाले. आता या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.
तंटा नाय तर घंटा नाय... रितेश भाऊचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरांत तोंडपाठ झालाय. रिअॅलिटी शोचा बाप असणाऱ्या 'बिग बॉस मराठी'चे आतापर्यंत चार प्रोमो आऊट झाले. या चारही प्रोमोमध्ये रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी' पाहायला मिळाली. आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलाय. प्रोमो पाहून सारेच म्हणतायत,"आररर खतरनाक". तसेच 'बिग बॉस'च्या घराचं दार कधी उघडणार याची प्रतीक्षाही संपली आहे.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ
'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंत आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा रुबाब पाहायला मिळाला. पण नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतोय. प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार... पण जे वाईट वागणार त्यांची तो... एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार.. कारण रितेश भाऊ म्हणतोय,"मी येणार तर कल्ला होणारच". आपल्या लाडक्या 'बिग बॉस' प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीखदेखील जाहीर केली आहे. या प्रोमोने सर्वत्र धुरळा उडवून दिलाय.
वाचा: Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी
मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त १५ दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या
संबंधित बातम्या