मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved Box Office Collection: ‘वेड’ गाठणार ५० कोटींचा टप्पा! जाणून घ्या आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ved Box Office Collection: ‘वेड’ गाठणार ५० कोटींचा टप्पा! जाणून घ्या आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 16, 2023 01:42 PM IST

Ved Box Office Collection : सलग तिसऱ्या आठवड्यात ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.

Ved
Ved

Ved Box Office Collection : ‘वेड’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख या जोडीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सलग तिसऱ्या आठवड्यात ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. ‘वेड’ हा चित्रपट आता ५० कोटींच्या टप्प्यात पोहोचला आहे. या आठवड्यात ‘वेड’ हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करणार आहे.

दुसऱ्या वीकेंडला देखील ‘वेड’ या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने १.३५ कोटी, शनिवारी २.७२ कोटी आणि रविवारी २.७४ कोटी अशी धमाकेदार कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४७.६६ कोटींची कमाई केली आहे. या आठवड्यात ‘वेड’ हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, बाहेरील राज्यात देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘वेड’ चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे जाहीर केले आहेत. तर, शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होईपर्यंत ‘वेड’ या चित्रपटाची घौडदौड अशीच सुरू राहील, असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना आता रितेश देशमुख याने नवीन घोषणा देखील केली आहे.

‘वेड’ या चित्रपटात श्रावणी आणि सत्याचं पुढे काय झालं, हे आता लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. ‘वेड’ या चित्रपटाचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यातून सत्या आणि श्रावणीची प्रेमकहाणी सांगितली जाणार आहे. प्रेक्षकांना देखील या गाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुखसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

IPL_Entry_Point