चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. आज ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा हा सण आनंदाने साजरा केला जात आहे. घरोघरी गुढी उभारल्या जातात. अनेकजण देवापुढे नैवेद्य दाखवण्यासाठी गोडधोड पदार्थ बनवतात. नुकताच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मुलांसोबत गुढी उभारली आहे. देशमुखांची लाडकी सून अभिनेत्री जिनिलियाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
जिनिलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश मुलांसोबत गुढी सजवून उभारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलियाने 'पहाटे लवकर उठून गुढी उभरली. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर जिनिलीयाने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत रितेशबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
वाचा: 'ए भीडू' म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ
रितेशचा काही दिवसांपूर्वी वेड हा मराठी चित्रपट पदर्शित झाला होता. या चित्रपटात रितेशची पत्नी, अभिनेत्री जिनिलिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता रितेशने 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश स्वत: करणार आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री जिनिलिया करणार आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट २०२५मध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.
वाचा: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल
गुढी पाडवा या सणानिमित्त अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढल्या जातात. रस्त्यावर होणारी गर्दी पाहता मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद करण्यात आले आहे तर काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. गिरगाव येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गिरगावात मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा काढण्यात येतात. त्यामुळे येथील काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेता वाहतुकीसाठी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत गिरगावची शोभायात्रा व विशिष्ट भाग वगळता उर्वरित भागात वाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या