बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते, लाडके कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख ओळखले जातात. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवतानचे फोटो आणि मजेशीर रिल्स शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे रितेश आणि जिनिलिया हे महाराष्ट्रात खास करुन दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर रितेशचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मुलांची फुटबॉल मॅच खेळताना दिसत आहे.
रितेश आणि जिनिलियाची दोन्ही मुले ही कायमच फूटबॉल खेळताना दिसतात. त्यांचे मैदानावरील फोटो आणि व्हिडीओ देखील अनेकदा समोर आले आहेत. आता या दोघांच्या कष्टाचे चिझ झाले आहेत. इतक्या कमी वयात दोघांची एका नामांकित फूटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांची फूटबॉल मॅच ही परदेशात होती. ती पाहण्यासाठी रितेश आणि जिनिलिया गेले होते.
वाचा: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातनं होळीनिमित्त घेतला खास उखाणा, पाहा व्हिडीओ
जिनिलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला रितेशचा मुलांची फूटबॉल मॅच पाहतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेशने निळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाचा गॉगल लावला आहे. तसेच तो शिट्टी वाजवताना दिसत आहे.
वाचा: टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू
जिनिलियाने रितेशच्या फोटोवर, “मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असते तुमची मॅच सुरु असताना प्रेक्षकांमधून ऐकू येणारी सर्वात मोठ्या आवाजाची शिट्टी ही तुमच्या बाबाची असेल आणि तो कायम त्याचा शब्द पाळतो. आमची ७ आणि ९ वर्षांची मुले एवढ्या लवकर BarcaIndia कडून खेळतील असे मला खरच वाटले नव्हते” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: मुलीला मालिका दाखवत नाही; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीने केला खुलासा
रितेश आणि जिनिलिया हे दोघेही मुलांची मॅच पाहण्यासाठी स्पेश येथील स्टेडियममध्ये गेले होते. जिनिलिया सतत मुलांकडे लक्ष देत असते. ती इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय असल्याचे पाहायला मिळत नाही. दोघांचा वेड हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता रितेशचा 'हाऊसफुल्ल ५' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये तो व्यग्र आहे.