Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाने सजलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाने सजलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाने सजलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Published Sep 04, 2023 08:23 AM IST

Rishi Kapoor Birth Anniversary Special: फिल्मी वातावरणात वाढलेल्या ऋषी कपूर यांनी अगदी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात ते बालकलाकाराच्या भूमिकेत दिसले होते.

Rishi Kapoor
Rishi Kapoor

Rishi Kapoor Birth Anniversary Special: बॉलिवूडचा लाडका ‘चिंटू’ अर्थात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्यांमध्ये ऋषी कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी हिंदी चित्रपटांचे दमदार सुपरस्टार राज कपूर यांच्या घरी झाला. फिल्मी वातावरणात वाढलेल्या ऋषी कपूर यांनी अगदी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात ते बालकलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारून त्यांनी आपल्या चित्रपट प्रवासाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल...

बॉबी

‘बॉबी’ या चित्रपटातून ऋषी कपूर यांना त्यांचे वडील राज कपूर यांनी मुख्य अभिनेता म्हणून लाँच केले होते. या चित्रपटात त्यांची को-स्टार म्हणून अभिनेत्री डिंपल कपाडिया झळकल्या होत्या. ऋषी कपूर यांच्या या पहिल्याच चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले. चित्रपटासोबतच त्यातील गाणीही लोकांना खूप आवडली होती.

अमर अकबर अँथनी

अमर अकबर अँथनी या सुपरहिट चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना यांच्यासोबत ऋषी कपूरही दिसले होते. चित्रपटात इतके मोठे स्टार असूनही ऋषी आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले. त्यांनी साकारलेली अकबरची भूमिका आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.

Kiran Mane: “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

कर्ज

‘कर्ज’ हा ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची लोकांनी खूप प्रशंसा केली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आजही लोकांना या चित्रपटातील गाणी ऐकायला आवडतात.

अग्निपथ

२०१२मध्ये रिलीज झालेल्या 'अग्निपथ' या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचा मुख्य खलनायक संजय दत्त असला तरी, अभिनयाच्या बाबतीत ऋषी कपूर या दोघांपेक्षा वरचढ ठरले होते. या चित्रपटातील रौफ लाला या त्यांच्या व्यक्तिरेखेने हृतिक आणि संजय यांच्या पात्रांपेक्षा बाजी मारली.

डी डे

२०१३मध्ये रिलीज झालेल्या ‘डी डे’ या चित्रपटात ऋषी कपूर यांनी एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. यामध्ये इरफान खान, अर्जुन रामपाल, श्रुती हासन आणि हुमा कुरेशीसारखे बॉलिवूड कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. 'डी डे' चित्रपटात ऋषी कपूरला नकारात्मक भूमिकेत काम करताना पाहून प्रेक्षकांना वेगळाच धक्काच बसला होता. मात्र, त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.

Whats_app_banner