Rinku Rajguru Viral Video: मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'सैराट.' या चित्रपटातील आर्चीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आर्ची ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरुने साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ७-८ वर्षे झाली आहेत. तरी देखील आर्चीची लोकप्रियता कायम आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रिंकू ही नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहच्या पुण्यातील कॉन्सर्टला गेली होती. रिंकूच्या आयुष्यातला हा पहिला लाइव्ह कॉन्सर्ट आहे. या कॉन्सर्टचा व्हिडीओ रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, “जेव्हा तुमच्या मनातली गोष्ट सांगायला शब्द सापडत नाहीत. तेव्हा संगीत तुमच्या मनातील गोष्ट सांगतं. माझा हा पहिलाच कॉन्सर्ट होता, ज्याचा अनुभव खूपच भारी होता,” असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो
व्हिडीओमध्ये रिंकूने काळ्या रंगाचा टॉप आणि शेवाळी रंगाचा स्कर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. मोकळे केस आणि गळ्यात सोन्याची चैन असा रिंकूचा सिंपल लूक आहे. या कॉन्सर्टमध्ये रिंकूने अरिजितच्या गाण्याचा आनंद लुटला आहे. तिच्यासोबत या कॉन्सर्टला महेश मांजरेकरांची मानस कन्या गौरी इंगवले देखील असल्याचे दिसत आहे. दोघीही अरिजितच्या कॉन्सर्टची मजा घेत आहेत.
वाचा: रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर द्यावी लागतेय झुंज! पाहा ‘योद्धा’चे कलेक्शन
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. व्हिडीओमध्ये रिंकू ही अरिजितची चाहती असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पाहून एका चाहतीने, 'मॅडम तुम्हाला पाहाण्यासाठी देखील आम्ही असेच उभे असतो' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'तुझी स्माइल खूपच गोड आहे. तू अरिजितला पाहून आनंदी दिसत आहेस' अशी कमेंट केली आहे.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेसोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करताना दिसली होती. यावेळी रिंकू व सुबोधसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील होती. पण या त्रिकुटाचा कोणता नवा चित्रपट येतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.