काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमेने 'झिम्मा २' या चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे 'झिम्मा' चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. आता 'झिम्मा २' चित्रपट देखील अशीच जादू प्रेक्षकांच्या मनावर असे ट्रेलर पाहून म्हटले जात आहे.
‘झिम्मा २’ चित्रपटाच्या २ मिनिटे ५९ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर परदेशात गाडी लावताना होते. ट्राफीकचा नियम मोडल्यामुळे परेदशातील पोलीस त्यांना थांबवतात. त्यानंतर रिंकू राजगुरुची एण्ट्री होते. एकंदरीतच चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: गौतमीच्या कातिला अदा! ठाण्यातील तरुण घायाळ
यापूर्वी 'झिम्मा'मधून सात मैत्रिणींची कथा दाखवण्यात आली होती. आता 'झिम्मा २'मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. त्यामुळे आता धमालही दुपटीने वाढली आहे. इंदू (सुहास जोशी) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या या सहलीत काही सरप्राइसेज आहेत, भरपूर धमाल आहे. मागच्या वेळेप्रमाणे ही ट्रीपही अविस्मरणीय होणार असून 'झिम्मा'च्या निमित्ताने बहरलेल्या या मैत्रीची वीण 'झिम्मा २'मध्ये अधिकच घट्ट होणार आहे. त्यामुळे यंदाचे रियुनिअन एकदम बेस्ट असणार, हे नक्की!
आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या