Rinku Rajguru update: मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'सैराट.' या चित्रपटातील अर्ची आणि परश्याच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. अर्ची ही भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या रिंकू एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा रिंकू एका कार्यक्रमात चिडल्यामुळे रंगल्या आहेत.
जळगाव शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला रिंकू राजगुरुने हजेरी लावली. रिंकूची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. चाहत्यांच्या या तुडुंब गर्दीतून रिंकूला बाहेरही पडता येत नव्हते. तिला चाहते धक्का देत होते. ते पाहून रिंकूला राग अनावर झाला. तिने 'तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का?' असा सवाल केला आहे.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत
जळगावमधील कार्यक्रमाला रिंकू येणार बातमी पंचक्रोशीत पसरताच लाखो चाहते तेथे उपस्थित झाले. ही गर्दी पाहून आयोजकांची देखील डोकेदुखी वाढली होती. गर्दीतून रिंकूला बाहेर कसे काढावे असा प्रश्न त्यांना पडला होता. चाहते रिंकूसोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत होते. या सगळ्या गर्दीत रिंकूला धक्का लागत होता, तिला चालताही येत नव्हते. त्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर काहीसे नाराजीनाट्य पाहायला मिळाले.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ
रिंकूने काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली होती. तिचा 'आशा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रिंकू ही हिरवी साडी,गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर स्माईल अशा लूकमध्ये दिसली. तसेच ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत 'खिल्लार' या चित्रपटात देखील दिसणार आहे.‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. त्यासोबतच तिची १०० डेज ही सीरिज देखील आली होती.
या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सहअभिनेत्री रिंकु राजगुरुची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परश्या हे फार चर्चेत आले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. आमिर खानची मुलगी आयराच्या लग्नात रिंकू आणि आकाशने एकत्र हजेरी लावली. तेव्हा पासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले.