मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यात जोडीने पोहोचले ‘सैराट’चे परश्या-आर्ची! सोशल मीडियावर रंगली चर्चा

Viral Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यात जोडीने पोहोचले ‘सैराट’चे परश्या-आर्ची! सोशल मीडियावर रंगली चर्चा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 15, 2024 08:44 AM IST

Ira Khan-Nupur Shikhare Reception: आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Rinku Rajguru and Akash Thosar
Rinku Rajguru and Akash Thosar

Ira Khan-Nupur Shikhare Reception: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत विवाह केला. ३ जानेवारी रोजी त्यांनी मुंबईत कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले होते. तर, नुकतेच त्यांनी उदयपूरच्या ताज आरवली रिसॉर्टमध्ये ख्रिश्चन पद्धतीने शाही विवाह केला. यानंतर खान आणि शिखरे कुटुंबाने आता एका भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन केले होता. या रिसेप्शन सोहळ्याला अगदी शाहरुख खानपासून ते अनिल कपूरपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या सगळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या शाही रिसेप्शन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंमध्ये अनेक कलाकारांच्या झलक दिसल्या आहेत. ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी देखील आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. दोघेही एकत्र या कार्यक्रमाला आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Neil Nitin Mukesh Birthday: चित्रपटात ३० किसिंग अन् एक न्यूड सीन; नील नितीन मुकेशने बॉलिवूडमध्ये माजवलेली खळबळ!

आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी एकत्र या सोहळ्यात एन्ट्री घेताच सगळ्यांच्या नजरा त्यांच्या दिशेने वळल्या होत्या. गेल्या काही काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या वृत्तावर दोघांकडूनही अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, दोघे अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. आता देखील आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. यावेळी दोघांच्या लूकनेही सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्यात पोहोचलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने जांभळ्या आणि गुलाबी रंगाची सहावारी साडी नेसली होती. तर, केसांचा आंबाडा, गळ्यात चोकर नेकलेस आणि कानात झुमके असा सिंपल लूक तिने कॅरी केला होता. तर, अभिनेता आकाश ठोसर हा ऑल ब्लॅक लूकमध्ये अगदीच राजबिंडा दिसत होता.

WhatsApp channel