Rihanna At Anant-Radhika Pre Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा देशातच नाही, तर विदेशातही पाहायला मिळत आहे. आज या प्री वेडिंग सोहळ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. १ मार्चपासून या प्री वेडिंग कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करणार आहे. या जोडप्याच्या प्री-वेडिंगला अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हॉलिवूड पॉप सिंगर रिहानानेही अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. मात्र, या परफॉर्मन्सनंतर रिहाना लगेच तिच्या मायदेशी परतून गेली. या मागचं कारण आता तिने स्वतः स्पष्ट केलं आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात १ मार्च रोजी झालेल्या कॉकटेल पार्टीत रिहानाने लाईव्ह परफॉर्मन्स केला होता. तिच्या या धमाकेदार परफॉर्मन्सदरम्यान संपूर्ण अंबानी कुटुंबानेही तिच्यासोबत स्टेजवर डान्स केला. पण, रिहानाने हा परफॉर्मन्स संपताच आपल्या मायदेशी म्हणजेच अमेरिकेत परतण्याचा निर्णय घेतला. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केल्यानंतर रिहाना लगेचच अमेरिकेला रवाना झाली. रिहाना भारतात येताना इतकं सामान घेऊन आली होती, की ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. त्यामुळे इतकं सामान घेऊन आलेली रिहाना अवघ्या एका परफॉर्मन्सनंतर इतक्या लवकर आपल्या देशात का परतली? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, आता स्वतः रिहानाने इतक्या लवकर अमेरिकेत परतण्याचे कारण सांगितले आहे.
सोशल मीडियावर रिहानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रिहाना तिची मैत्रिण मेलिसा फोर्डसोबत कारमध्ये बसून लाईव्ह करताना दिसत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या व्हिडीओमध्ये रिहाना तिच्या मैत्रिणीशी बोलताना दिसत आहे. या दरम्यान ती तिच्या मैत्रिणीला विचारते की, हे खरंच लाइव्ह सुरू आहे का? यानंतर रिहानाचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते की, ‘मी भारतात चांगला वेळ घालवला आहे. माझ्याकडे फक्त दोनच दिवस होते. मी भारतातून लवकर निघण्याचे कारण माझी मुले होती. माझी लहान मुलं घरी वाट बघत होती. त्यामुळे मला भारतातून लगेच परत यावे लागले.’
रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये डायमंड्स, व्हेअर हॅव यू बीन, रुड बॉय आणि पोअर इट अप सारखी तिची हिट गाणी गायली. यावेळी तिने स्टेजवर आपल्या धमाकेदार डान्स अदा देखील दाखल्या. अंबानी कुटुंबापासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच रिहानाच्या परफॉर्मन्सचा खूप आनंद घेतला.
संबंधित बातम्या