मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Richa Chadha: यामी गौतमनंतर बॉलिवूडच्या आणखी एका जोडीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाले...

Richa Chadha: यामी गौतमनंतर बॉलिवूडच्या आणखी एका जोडीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाले...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2024 01:43 PM IST

Richa Chadha Pregnancy News: बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल हे आई-वडील होणार आहेत. अलीने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

Richa Chadha Pregnancy News
Richa Chadha Pregnancy News

Richa Chadha Pregnancy News: अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांनी नुकतीच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होते. यानंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एका जोडीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा आई होणार आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्स आणि मित्रांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल हे आई-वडील होणार आहेत. अलीने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. अली फजल याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘चिमुकल्या हृदयाचे ठोके हा जगातील सर्वात मोठा आवाज आहे.’ या कॅप्शनसोबत त्याने २ फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये १ अधिक १ बरोबर ३ असे लिहिले आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये अली फजल आणि रिचा चढ्ढा एकत्र दिसत आहेत. दोघेही एकमेकांचा हात धरून सुंदर फोटो पोज देत आहे.

कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अली फजलच्या या पोस्टवर सेलेब्स तसेच चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. चाहते आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. आयुष्मान खुराना, मृणाल ठाकूर, सबा आझाद, दिया मिर्झा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अली आणि रिचा यांनी कोव्हिड दरम्यान २०२०मध्ये लग्न केले होते. परंतु, त्यावेळी दोघांनी आपल्या लग्नाबद्दल कुणालाही काही सांगितले नव्हते. यानंतर, २०२२मध्ये दोघांनीही कुटुंब आणि मित्रांसोबत लग्न सोहळा आयोजित करून आपले लग्न धुमधडाक्यात साजरे केले. या दोघांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले होते.

कसे पडले एकमेकांच्या प्रेमात?

अली फजल आणि रिचा यांची पहिली भेट ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एका चॅट शोदरम्यान अली फजलने म्हटले होते की, या चित्रपटादरम्यान त्याने रिचाला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला होता. ‘फुकरे’ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत असताना अली सतत ऋचाजवळ जाऊन बसायचा. याच सेटवर अखेर त्यांची मैत्री जुळली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

WhatsApp channel

विभाग