Richa Chadha-Ali Fazal Baby: ‘हिरामंडी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल या जोडीच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अभिनेत्री ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती, तो क्षण अखेर आला आहे. रिचा चढ्ढा हिने एका मुलीला जन्म दिला आहे. रिचा चढ्ढाने १६ जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. लेकीच्या जन्माच्या २ दिवसानंतर या जोडप्याने आज एका निवेदनाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने मुलीला जन्म दिल्याचे लोकांना समजताच चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. रिचा आणि अलीने दिलेल्या आनंदाच्या बातमीने सगळेच खूप खूश झाले आहेत.
विशेष म्हणजे रिचा आपल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता तिची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेत्री आता एका मुलीची आई झाली आहे. १६ जुलै २०२४ रोजी एका सुदृढ मुलीचा जन्म झाल्याचे सांगत एका निवेदनाद्वारे या जोडप्याने ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘आमचे कुटुंब खूप आनंदी आहे आणि आम्ही आमच्या चाहत्यांच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी आभारी आहोत! लव, रिचा चढ्ढा आणि अली फजल.’
चार दिवसांपूर्वी म्हणजेच १४ जुलै रोजी रिचाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने तिच्या बाळची आगमनाची आशा व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये, अभिनेत्रीने अनेक वेळा अस्वस्थत वाटत असल्याचा उल्लेख केला होता. परंतु, असे असूनही तिला कधीही वेगळे वाटले नाही, उलट आनंद होत असल्याचे तिने म्हटले. या आधी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले होते, जे चाहत्यांना खूप आवडली होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या पतीसोबत खास अंदाजात दिसली होती. चाहत्यांनी दोघांच्या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सीरिजमधील तिच्या ‘लाजो’ या व्यक्तिरेखेने बरीच चर्चा निर्माण केली होती. या सीरिजने सगळ्यांचीच माने जिंकून घेतली होती.
संबंधित बातम्या